कुडाळ जिल्हा परिषद गटात भाजपात कुरघोड्यांचा धोका : विरोधकांची मोट बांधली जाणार का याकडे लक्ष
सूर्यकांत जोशी, कुडाळ 9421214450
स्पेशल रिपोर्ट
आरक्षण सोडतीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा मार्ग पूर्णतः मोकळा झाला आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता दृष्टीपथात आल्या आहेत. या निवडणुका जिल्ह्यात महायुती आणि महाआघाडी अशा होणार की प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किंवा पंचायत समिती गट गणात स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जाणार याबाबतच्या वरिष्ठ नेतेमंडळीच्या निर्णयाकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी शरद पक्षाने आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे राज्याचे प्रदेशाध्यक्ष पद दिले आहे शशिकांत शिंदे जिल्ह्यात महाविकास आघाडीची मोट बांधून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आव्हान निर्माण करणार का हा जसा जिल्ह्याच्या राजकारणात प्रश्न निर्माण झाला आहे त्याच पद्धतीने आमदार शशिकांत शिंदे यांची मातृभूमी असणाऱ्या जावली तालुक्यात ते नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यापुढे विरोधकांचे आव्हान निर्माण करणार का याबाबतची ही उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.
कुडाळ जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणे तापली आहेत. विधानसभेतील भाजपाच्या प्रचंड विजयाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत असल्याने या गटात ‘सेनापती कोण ठरणार?’ याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जावली पंचायत समितीचे सभापती खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे त्यामुळे पंचायत समिती निवडणुकीसाठी सुद्धा जोरदार रस्सीखेच आहे. सोमवारी गट आणि गणांचे आरक्षण काय पडते याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याचबरोबर जिल्ह्यात महायुती व महा आघाडी अशा लढती होणार की सर्व पक्ष स्वतंत्र लढणार याबाबत नेतेमंडळी काय निर्णय घेतात यावरही राजकीय समीकरणे अवलंबून आहेत.
???? आरक्षण ठरणार निर्णायक मुद्दा
सोमवारी १३ ऑक्टोबरला होणाऱ्या आरक्षण प्रक्रियेवर राजकीय भविष्य अवलंबून राहणार आहे. आता पहिले रोटेशन रद्द होऊन पुन्हा नव्याने आरक्षण पडणार असल्यामुळे खुल्या प्रवर्गातील इच्छुकांना सुद्धा संधीसाठी आशा पल्लवी झाले आहेत.खुल्या प्रवर्गाचे आरक्षण राहिल्यास भाजपमधील इच्छुकांमध्ये रस्सीखेच होईल, तर ओबीसी आरक्षण पडल्यास पूर्वीचे ओबीसी मध्ये सुद्धा अनेक ताकतीचे कार्यकर्ते तयारीत आहेत
???? भाजपात अंतर्गत कुरघोडीचा धोका
भाजपामध्ये प्रतापगड साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, जयदीप शिंदे, सुहास गिरी, वीरेंद्र शिंदे , मालोजीराव शिंदे यांच्यात जिल्हा परिषद गण व गटात नेतृत्वाची चढाओढ आहे. हे सर्व नेते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निष्ठावान असल्याने शेवटी तडजोडीचा फॉर्म्युला ठरवावा लागणार आहे. अशा राजकारणात बऱ्याचदा सेनापती नेता व पक्षासोबत असतो परंतु त्याचे सैन्य मात्र सैरभैर फिरत असते. मतदान संख्येच्या प्रमाणात आपल्याला सुद्धा सत्तेत वाटा मिळावा अशी अपेक्षा रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून एकनाथ रोकडे यांनीही केलेली आहे. ईव्हीएम मशीन निवडणूक पद्धतीने प्रभाग प्रभागातील मतदान करत असल्यामुळे त्या त्या विभागातील कार्यकर्त्यांच्या वर पक्ष नेतृत्वाचा दबाव राहणारच.
???? विरोधक अजूनही विस्कळीत
विधानसभा निवडणुकीत दीपक पवार यांनी तटस्थ भूमिका घेतल्याने विरोधकांची एकी कोलमडली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे,माजी आमदार सदाशिव सपकाळ, माजी शिक्षण सभापती अमित कदम आणि शिवसेनेचे एस.एस. पार्टे गुरुजी, एकनाथ ओंबळे, संदीप पवार, विरोधकांना संघटित करण्याचा प्रयत्न करत असले तरी अद्याप ठोस मोर्चेबांधणी झालेली नाही.
???? भाजपाला विकासकामांचा बळकट पाया
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गेल्या पंधरा वर्षांत मतदार संघात ठेवलेला सातत्यपूर्ण संपर्क सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांशी साधलेली जवळीक याचबरोबर रस्ते, पूल, गावोगावी सुरू असलेली विविध विकासकामे,शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी, लाडकी बहीण योजना अशा विकासकामांमुळे तालुक्यात जनाधार मजबूत केला आहे.
???? संभाव्य दावेदारांचे नवे समीकरण
कुडाळ गण व गटातून
सौरभ शिंदे, जयदीप शिंदे, वीरेंद्र शिंदे, मच्छिंद्र मुळीक,सुहास गिरी, जयश्री गिरी,महेश बारटक्के, अनिल किर्वे,दादा फरांदे पाटील, प्रवीण देशमाने यांच्या सह अनेक नवे चेहरे राजकीय पातळीवर सक्रिय झाल्याचे दिसते.
???? धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा संघर्ष
निवडणुकीत घराणेशाही आणि आर्थिक बळाला प्राधान्य दिले जात असल्याने सामान्य कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत आहे. काही कार्यकर्ते नव्या एकजुटीचा प्रयत्न करत असून “जनशक्ती विरुद्ध धनशक्ती” असा संघर्ष रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
???? जनतेच्या अपेक्षेतील प्रमुख विकासकामे
कुडाळ गटातील मतदारांना पुढील कामांची अपेक्षा —
1️⃣ पानस–कुडाळ रस्ता दर्जेदार करणे
2️⃣ रखडलेला क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावणे
3️⃣ महू हातगेघर धरणाच्या कालव्याचे काम पूर्ण करणे
4️⃣ एसटी बससेवा – कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई मार्गावर सुरू करणे
5️⃣ पाचवड–रत्नागिरी रस्ता दर्जेदार व जलदगतीने पूर्ण करणे
6️⃣ कुडाळ-मेढा सारख्या मोठया गावांसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प
7️⃣ लघुउद्योग व कृषीउद्योगांद्वारे स्थानिक रोजगारनिर्मिती
8️⃣ मेरूलींग बंडा पठार, महू व हातगेघर धरण परिसर व वैराटगड पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणे.
???? निष्कर्ष
कुडाळ जिल्हा परिषद गटात सध्या भाजपचे वर्चस्व असले तरी,आरक्षणाचे बदलते समीकरण, विरोधकांची एकी आणि पक्षांतर्गत कुरघोडी या तिन्ही घटकांमुळे पुढील निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची शक्यता आहे.
आगामी निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा संघर्षच निकाल ठरवेल, असे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

ae888vvip is another one promising a VIP experience. See what the hype is all about if you’re feeling fancy. Head over to: ae888vvip.