Tuesday, August 18, 2026
HomeTop Newsमारहाणीची  दखल मेढा पोलीस घेत नसल्याची चोवीस  वर्षीय  युवतीची तक्रार.

मारहाणीची  दखल मेढा पोलीस घेत नसल्याची चोवीस  वर्षीय  युवतीची तक्रार.

सूर्यकांत जोशी  कुडाळ – आपणास  गंभीर  मारहाण झाल्याची तक्रार मेढा  पोलीस ठाण्यात दि.15 नोव्हेंबर रोजी मेढा  पोलीस ठाण्यात दिली आहे. परंतु  गेल्या दहा  दिवसात मेढा  पोलिसांनी कोणतीही दखल  घेतली  नाही. संबंधित्तांकुडून मला व माझ्या कुटुंबियांना धोका  असल्याची  माहिती आर्डे ता. जावली  येथील तृप्ती मुकुंदराव जाधव या चोवीस  वर्षे युवतीने पत्रकारांशी बोलताना  दिली.लव्ह जिहाद प्रकरणात श्रद्धा वालकर च्या पत्राची  पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्याचे  प्रकरण  देशभर  गाजत  असताना  जावली  तालुक्यातील 24वर्षीय  युवतीने गंभीर  मारहाण झाल्याची तक्रार देऊन दहादिवस  होऊन गेले तरी  पोलीस कारवाई करत  नसल्याने  पोलीस अजून काय घडण्याची वाट पहात  आहेत असा संतप्त  सवाल  या युवतीने  व तिच्या पालकांनी केला आहे.

         तृप्ती जाधव  हिने दिलेल्या माहिती नुसार दि 11नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या  सुमारास त्यांच्या घराजवळ च्या वाडी नावाच्या शिवारात चुलते  परमेश्वर  जाधव  यांचे  वासरू पावट्याच्या शेतात  चरत  असल्याच्या कारणावरून  चुलत्याना वासरू  नीट बांधन्यास  सांगितले  या कारणावरून चुलत्यानी व त्यांचा मुलगा  विक्रम याने आपणास  लोखंडी सळई व लाकडी  दांडक्याने मारहाण केली. तसेंच मला  सोडवण्या साठी  आई आली असता  तिलाही मारहाण केली. या मारहाणीत तृप्ती हिला डोळ्याच्या वर डोक्याला सळई लागल्याने रक्त वाहू लागले. त्यावर आपणास  उपचारासाठी सातारा येथीलक्रांती सिह नानापाटील सर्व साधारण रुग्णालयात दाखल  करण्यात आले होते. जखम  मोठी  असल्याने सहा  टाके पडले  आहेत.रुग्णालयातून उपचार  घेऊन  आल्यावर लगेचच  मेढा  पोलीस ठाण्यात तक्रार दिली परंतु मेढा  पोलिसांनी संबंधितांवर अद्याप कोणतीही कारवाई  केली नाही. त्यामुळे यामध्ये काही आर्थिक तोडपाणी झाल्याचा संशय  तृप्ती जाधव  हिने व्यक्त केला आहे.

            या बाबत  मेढा  पोलीस ठाण्याशी  संपर्क  साधला  असता  घटनेचा पंचनामा  करण्यात आला आहे.या गुन्ह्यात वापरलेली  सळई लाकडी  दांडके जप्त करण्यात आले असून लवकरच आरोप पत्र दाखल  करण्यात येईल असे सा. पो. नि. अमोल माने यांनी सांगितले.

 सर्व सामान्य जनतेला  वाऱ्यावर सोडून पोलीस दल मुख्यमंत्र्यांच्या दिमतीला.

       दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे कराड दौऱ्यावर असल्याने  जिल्हा जिल्हा पोलीस दल विशेष बंदोबस्तासाठी  तैनात  होते. गेले दोन दिवस  जावली तालुक्याची 165 गावांची कायदा  आणि सुव्यस्था सपोनि  अमोल माने यांच्या सह  तीन पोलीस कर्मचारी  सांभाळत  आहेत. दि.21 रोजी कुडाळ येथे  झालेल्या घर फोडीचे पाच  दिवस  उलटून  गेले तरीही  अद्याप पंचनामे  करण्यात आले नाहीत. तालुक्यातील पोलीस चौक्याना  टाळे दिसून येत आहेत. एकूणच  जावळीच्या  कायदा  आणि सुव्यवस्थेचे  तीन तेरा वाजल्याचे  चित्र दिसून येत आहे.व्ही आय पी विशेष  बंदोबस्ता  साठी  स्वतंत्र सुरक्षा तैनात  करण्यात यावी अशी  मागणी  सर्व सामान्य जनतेतून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page