
मेढा,ता. १ : मातंग समाज्याच्या सर्वांगीण विकासासाठी व न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लहुजी शक्ती सेना संघटनेच्या जावळी तालुका अध्यक्षपदी राजाराम रघुनाथ खुडे ( रा. गवडी) यांची आज निवड झाली. लहुजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
खंडाळा येथील किसनी वीर सभागृहामध्ये लहुजी शक्ती सेनाच्या सातारा जिल्हास्तरीय आढावा बैठकीत आज राजाराम खुडे यांची निवड करण्यात आली. यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव,संपर्क प्रमुख रामभाऊ पाटोळे, पंचायत समिती सदस्य शोभा जाधव, महादेव खुपसुंदर, सतिश सपकाळ , राहूल कसबे, चंद्रकांत भिसे, राजेंद्र साठे आदी उपस्थित होते.
राजाराम खुडे यांनी गवडी गावांसह तालुक्यामध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक कार्यामध्ये व मातंग समाज संघटनामध्ये केलेल्या उल्लेखनिय कामाबद्दल त्यांची आज लहुजी शक्ती सेनेच्या जावळी तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णु भाऊ कसबे म्हणाले, राजाराम खुडेंसारखा एक चांगला कार्यकर्ता मातंग समाज्याला योग्य दिशा देण्याचे काम करील . जावळी तालुक्यातील सर्व मातंग समाज्याने राजाराम खुडेंच्या नेतृत्वाखाली एकत्र होवून संघटीत व्हावे. मातंग समाज्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत.
राजाराम खुडे म्हणाले, आजपर्यंत प्रामाणिक व निष्ठेने करत आलेल्या कामाचे फळ म्हणून आज लहुजी शक्ती सेनेच्या जावळी तालुका अध्यक्षपदी निवड झाली. या निवडीने माझ्यावरची जबाबदारी वाढली असून यापुढे मातंग समाज्याचा विकास हा माझा ध्यास आणि श्वास राहणार आहे.