कुडाळ येथे तालुक्यातील पहिल्या अल्कोहोल बेस सँनिटायझर टनेलची उभारणी

सूर्यकांत जोशी कुडाळ – कोरोना विषाणूचा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुडाळ येथे अल्कोहोल बेस सँनिटायझर टनेल उभारण्यात आला आहे.या टनेल सोबतच बाजारात येणाऱ्या नागरीकांना सँनिटायझर ने हात निर्जंतुक करण्याची सुविधा कुडाळ येथील सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असणाऱ्या कुडाळ युवा मंच,गजराज मित्र मंडळ, ९२ ग्रुप व साई मित्र मंडळाच्या वतीने ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
जावली तालुक्यात मुंबई, पुणे या मोठ्या शहरांसह पर जिल्हयातुन पंचवीस हजारांहून अधिक लोक आले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.तालुक्यातील निझरे येथे मुंबई हुन आलेल्या दोन व्यक्ती कोरोना पाँझिटीव्ह निघाल्या तर त्यांच्या संपर्कात आलेल्या एका तरुणाचीही कोरोना टेस्ट पाँझिटीव्ह आली. त्यामुळे तालुक्यात कोरोना पाँझिटीव्ह तीन रुग्ण झाले आहेत. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या काही लोकांचे अहवाल अजुन यायचे आहेत. एकूणच या घटनेनंतर जावलीतील जनता अधिक जागरूक झाली असून कोरोनाचा तालुक्यातील शिरकाव रोखण्यासाठी प्रशासना बरोबरच सामाजिक कार्यकर्ते आणि मंडळेही नियमास अधिनराहुन मदतीसाठी पुढे येत आहेत.
कुडाळ गावातील बाजारपेठेत येणारी प्रत्येक व्यक्ती या सँनिटायझर टनेलच्या माध्यमातून निर्जंतुक होऊन बाजारात येईल व बाजारातून घरी जाताना सुद्धा निर्जंतुक होऊन घरी जाईल संभाव्य कोरोना संसर्गाचा धोका कमी होऊ शकेल या उद्देशाने या मंडळांनी कुडाळ बसस्थानकासमोर ही सुविधा उपलब्ध केली आहे.
या उपक्रमाला जावली चे तहसीलदार शरद पाटील व तालुका वैद्यकीय अधिकारी मोहिते यांनी भेट दिली असून उपक्रमाचे कौतुक केले. तसेच याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.