लाँकडावुन मुळे कोकणचा राजा जावली पासून दूरच ; कोकणातील हापूस आंब्याची जावली करांना प्रतिक्षा.


लाँकडावुन मुळे कोकणचा राजा जावली पासून दूरच ; कोकणातील हापूस आंब्याची जावली करांना प्रतिक्षा.
सूर्यकांत जोशी कुडाळ – कोरोना विषाणूच्या प्रादर्भावामुळे संपूर्ण देशात लाँकडावुन आहे. सार्वजनिक व खाजगी वहातुक व्यवस्था बंद असल्याने यावर्षी कोकणचा राजा अशी ओळख असणारा प्रसिद्ध रत्नागिरी अथवा देवगडचा हापूस आंबा अजूनही जावली तालुक्यातील बाजारपेठेत दाखल झालेला नाही.
सध्या उच्च, मध्यम आर्थिक स्थिती असणाऱ्या कुटुंबात लाँकडावुन मुळे कित्येक वर्षांनंतर सर्व कुटुंबीय एकत्र निवांत आले आहेत.कोरोनाने फिरायला आणि कामाला बंदी केली असली तरीही घरच ताज जेवन खायला मात्र संधी दिली आहे. घरातील प्रत्येकाच्या विविध पदार्थ खाण्याच्या फर्माईशी पूर्ण करताना महिला वर्गाची दमछाक होत आहे. तरीही आलेल्या या सुसंधीचा फायदा महिला वर्गही चांगलाच घेत आहे. हातातील मोबाईल युट्यूब वरुन विविध प्रकारच्या रेसिपी शिकवल्या जात आहेत. त्यामुळे महिलांना सुद्धा नवनवीन पदार्थ शिकण्याची संधी मिळाली आहे. आणि त्यांच्या मदतीला हौशी पुरुष वर्गही पुढे येत आहे.
उन्हाळ्यात आंबेरस पुरीच्या जेवणाची सर कशातच नसते .पूर्वी तालुक्याच्या ग्रामीण भागात गावरान आंबा मोठ्या प्रमाणात होता.शेतकरी पिकलेल्या आंब्याच्या पाट्या घेऊन बाजारात येत होते. त्यावेळी आंब्याचे दरही मर्यादित असल्याने डझना ऐवजी पाटीतील सर्व आंब्याचाच भाव विचारला जायचा. आणि पाटीभर आंबे घरात आणले की , आंबेरस तर व्हायचाच पण अगदी चार आठ आंबे चोखून खाण्याची मजा काही औरच असायची. खाल्लेल्या आंब्याच्या कोया सुकवुन पुन्हा त्या खेळण्यासाठी बालचमू वापरत होता. तर त्यानंतर पावसाळ्यात या कोयांची रोपे सर्वत्र उगवताना दिसायची.
पण काळ बदलला तसा हा गावरान आंबाही आता जवळपास हद्दपार होत आला आहे. त्याची जागा आता कलमी आंब्याच्या झाडानी घेतली आहे. यावर्षी आंब्याचे कलम लावले की पुढच्या वर्षी चार दोन आंबे घरचे तयार तेही अगदी हापुस ,केसरी चांगल्या वानाचे.पण यावर्षी हवामानातील बदला मुळे अनेक आंब्याच्या झाडांना आंबे लागले नाहीत. तसेच इकडच्या हवामानात आंबे तयार होण्यासाठी जुन महिना उजाडणार आहे.