कुडाळ येथे आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे मोफत वाटप

नागरीकांनी नियम पाळून कोरोना बाबत काळजी घ्यावी – सौरभ शिंदे
सूर्यकांत जोशी कुडाळ – कोरोना विषाणूचा आता जावली तालुक्यात शिरकाव झाला आहे. आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्यांच्या माध्यमातून रोग प्रतिकारशक्ती वाढवून तसेच नियम पाळून नागरीकांनी कोरोना पासून स्वसंरक्षण करावे असे आवाहन पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांनी केले .
सौरभ शिंदे यांच्या सहकार्यातून व कै लालसिंगराव बापूसो शिंदे पतसंस्था यांचे विद्यमाने व कुडाल वि का स सेवा सोसायटी यांचे सहकार्यातून आर्सेनिक अल्बम ३० या रोग प्रतिकारक गोल्यांचे प्रा आरोग्य केंद्र येथे मोफत वाटप नुकतेच करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र शिंदे,प्रतापगड कारखान्याचे संचालक मालोजीराव शिंदे, उपसरपंच गणपत कुंभार, प्रा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ .वेलकर, डॉ. सौ. रमा पाटुकले, डॉ .वालवेकर, उत्तमराव पवार, ग्रामपंचायत सदस्य दिनेश किर्वे व ग्रामस्थ उपस्थित होते.