Skip to content

दिनेश किर्वे यांच्या तर्फे कोरोना योद्ध्यांना फेसशिल्ड

बातमी शेयर करा :-

कुडाळच्या कोरोना योद्ध्यांना फेसशिल्ड वाटप

 ग्रामपंचायत सदस्य दिनेश किर्वे  यांचा अभिनव उपक्रम

सूर्यकांत जोशी कुडाळ- कोरोना युद्धात आपल्या जीवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडत असलेल्या कोरोना योद्ध्यांना कुडाळ ग्रामपंचायत सदस्य दिनेश किर्वे यांनी फेसशिल्ड व हँण्डग्लोजचे वाटप केले.त्यांनी यापूर्वी कुडाळ गावात सँनिटायझर व मास्क वाटप केले आहे.किर्वे यांच्या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. 

          कुडाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनेश किर्वे यांच्या वतीने फेसशिल्ड व हँण्डग्लोजचे नुकतेच वाटप करण्यात आले.यावेळी पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वेलकर व कुडाळचे जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

           पोलीस, आशा व अंगणवाडी सेविका, पत्रकार व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाचा  धोका पत्करून लोकांच्या पर्यंत पोहचावे लागते.अशावेळी कोरोना विषाणू पासून संरक्षण होण्यासाठी फेसशिल्ड व हँण्डग्लोज असणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून अशास्वरुपाची मदत केली असल्याचे दिनेश किर्वे यांनी सांगितले. यावेळी त्यांचा मित्र परिवार उपस्थित होता.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!