Skip to content

प्रशासनाने कोरोना सोबतच जनतेच्या रखडलेल्या कामांना गती देण्याची आवश्यकता

बातमी शेयर करा :-

जिल्हा प्रशासनाने कोरोना सोबतच जनतेच्या रखडलेल्या कामांना गती देण्याची आवश्यकता

सूर्यकांत जोशी कुडाळ – गेले तीन महिने संपूर्ण प्रशासन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. मर्यादित कर्मचारी असताना प्रशासनाने केलेले काम नक्कीच प्रशंसनीय आहे. परंतू आता प्रशासनाने  रखडलेल्या कामांना गती द्यावी.शासन दरबारी पडून असलेल्या अनेक अर्जांचा तातडीने निपटारा करण्यात यावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.कोरोना प्रतिबंधात्मक यंत्रणा नक्कीच आवश्यक आहे. परंतू अन्य कामकाजासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असणेही तितकेच महत्वाचे आहे.

            सध्या पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे.शेतकरी वर्गाच्या खरीप हंगामातील कामांना वेग आला आहे. त्यामुळे प्रशासनाला या हंगामा बरोबरच पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थिती बाबतही सतर्क रहावे लागणार आहे. तसेच गेल्या तीन महिन्यांत विविध शासकीय कार्यालयात जनतेने विविध कामासाठी आपले अर्ज प्रस्ताव तसेच न्यायालयीन प्रकरणे दाखल केलेली आहेत. या सर्वकामांना आता गती देणे आवश्यक आहे अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.

            कोरोनाविषाणू प्रादर्भाव व परिणामां बाबत तीन महिन्यां पूर्वी जनता पूर्णपणे अनभिज्ञ होती.आणि अशा परिस्थितीत जनतेच्या आरोग्य आणि जीवाचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाला अत्यंत जागरूक पणे कार्यरत रहावे लागले. परंतु गेल्या तीन महिन्यांत प्रशासन आणि विविध प्रसिद्धी माध्यमांनी कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत अत्यंत प्रभावी पणे जनजागृती केली. कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी काही नियमांचे पालन केल्यास नियमित व्यवहार सुरू करण्यात कोणताही धोका होणार नाही याची जाणीव जनतेला झालेली आहे तसेच कोविड १९ सोबत चारहात लांब राहुन दैनंदिन व्यवहार सुरळीत होणे आवश्यक आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!