Skip to content

मानसाची जगण्यासाठी परिस्थितीशी झुंज सुरू

बातमी शेयर करा :-

डोक्यावर कोरोनाची टांगतीतलवार ठेवून        

मानसाची जगण्यासाठी परिस्थितीशी झुंज सुरू

  सूर्यकांत जोशी कुडाळ – ”झुंजार माणसा झुंज दे, हेच तुझेरे काम.माणूस असुनी माणूस करतो माणूसकी बदनाम”. या व्ही. शांताराम दिग्दर्शित झुंज चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांच्या गीता प्रमाणे कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी सर्वसामान्य जनतेची जगण्यासाठी    झुंज सुरू असल्याचा प्रत्यय येत आहे.

              गेल्या तीन महिन्यांत कोरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य धोक्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. अनेक कुटुंबांची वाताहत झाली. जीववाचवण्यासाठी कोसोंदुर पायपीट करत निघालेल्या अनेकांना विविध अपघातात प्राण गमवावे लागले, अनेकांनी जीवघेणी पायपीट करून आपला गाव आणि घर जवळ केले. पण कोरोनाच्या भीतीने घरात येण्यास घरच्यांनी च नाकारल्याने अनेकांच्या नशीबी ‘माणसानेच माणूसकी बदनाम ‘ केल्याचा प्रत्यय आला.तर रेल्वेस्टेशनवर भूकेने व्याकूळ होऊन गत प्राण झालेल्या आपल्या मातेला उठवण्यासाठी एक वर्षाच्या चिमुकल्याची धडपड ह्रदय हेलावून टाकणारी होती. असे अनेक ह्रदय स्पर्शी प्रसंग गेल्या तीन महिन्यांत प्रसिद्धी माध्यमातून पाहावयास मिळाले.

              कोरोनाचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्माण परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारे युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. सुरूवातीला हे संकट पंधरा दिवस अथवा महिना भरात संपेल अशी सर्वसामान्य जनतेची भावना होती. आणि तेवढा वेळ संयम जनतेने दाखवला सुद्धा. पर्ंतु जसजशी कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढत गेली आणि दर पंधरा दिवसांनी लाँकडाऊन च्या घोषणा होऊ लागल्या तसे थबकलेल्या हाताना पोटाची भूक गप्प बसू देईना झाली. तर कोसोंदुर असणाऱ्या आप्तेष्टांची आठवण आणि त्यांनी काळजी मुळे गावी येण्यासाठी सूर आळवणी सुरु केल्याने मनाला लागलेली हुरहुर जागी थांबू देईना अशी अवस्था परप्रांतीयांची झाली. आणि येणाऱ्या परिस्थितीशी झुंज देण्याची तयारी करून अनेकांनी शेकडो किलोमीटर पायी जाण्याचा निश्चय केला. 

            आपल्या गावी, आपल्या माणसांमध्ये जाण्याची जी ओढ गोरगरीब परप्रांतीय मजुरांच्या मनात होती तीच ओढ नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने परदेशात परराज्यात गेलेल्या श्रीमंतांच्या ही मनात होते. या भावनेला गरीब आणि श्रीमंत हा भेदभाव ठाऊक नव्हता.मोठ्या औद्योगिक कारखान्यांपासून गावतल्या पानटपरी पर्यंतचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. रात्रंदिवस धावणारी शहरे चीडीचुप झाली होती. तर खेडीपाडी वाड्या वस्त्यांत स्मशान शांतता होती. उठल्या पासुन रात्री झोपे पर्यंत मेहनत घेणाऱ्या शरीराला आणि मेंदुला सक्तीची विश्रांती मिळाली. महिना दोन महिने अगदी कुटुंबा समवेत राहण्याचे समाधान अनेकांनी अनुभवले.पण आता उठ माणसा आळस झटक आणि कामाला लाग, असा आदेश पाचवा लाँकडाऊन घेऊन आला .आणि अडिच तीन महिने घरात आराम करणारा माणूस पून्हा जीवनाच्या संघर्षासाठी झुंज देण्यास सज्ज झाला.

               या तीन महिन्यांत करोडोंची उलाढाल असणारे मोठे उद्योग धंदे ठप्प झाले .अनेक उच्चविद्याविभूषित घरात बसले.परंतु देशातील शेतकर्याची मात्र झुंज सुरुच होती. बाहेरील सर्वच व्यवहार ठप्प असल्याने शेतात घामगाळुन आणि भांडवल घालून पिकवलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध नव्हती. शेतीमालाच्या उत्पन्नातुन प्रगतीचे मनात बांधलेले इमले पत्त्यांचा बंगल्या प्रमाणे कोसळे.उभ्या पिकांवर जड  अंतकरणाने नांगर फिरवला. तरीही पावसाळा तोंडावर येताच खरीप हंगामासाठी हा बळीराजा पुन्हा एक झुंज देण्यासाठी सज्ज झाला आहे.

   ‘आता घ्या तंबाखू नाही,आता घ्या सँनिटायझर ‘        

पाचव्या लाँकडाऊन मुळे बाजारपेठांतील दुकाने उघडल्याने बाजारपेठ पुन्हा माणसांच्या गर्दीने फुलली आहे.पण या गर्दीत ही माणूस मास्क लावलेला,काहीसे अंतर ठेवणारा आणि एरव्ही आपुलकी ने घ्या तंबाखू म्हणून तंबाखू हातावर ठेवणारा आता काळजीने हातावर घ्या सँनिटायझर म्हणून सँनिटायझर देत आहे. असा बदलेला माणूस कोरोनाशी झुंज देण्यासाठी सज्ज झाला आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!