Skip to content

सौरभ ऋषिकांत शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त कोरोना योद्ध्यांना सुरक्षा किट चे वाटप

बातमी शेयर करा :-

सौरभ ऋषिकांत शिंदे  यांच्या वाढदिवसा निमित्त कोरोना योद्ध्यांना सुरक्षा किट चे वाटप

सूर्यकांत जोशी कुडाळ- सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. सुरुवातीला शहरी भागापुरते मर्यादित असलेल्या कोरोनाव्हायरस ने आता सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाय पसरले आहेत. अशा परिस्थितीत जावली तालुक्यासारख्या दुर्गम विभागात  पुरेशा सुरक्षा साधनां शिवाय जीव धोक्यात घालून कोरोना योद्धे आपले कर्तव्य बजावत आहेत. याची दखल घेऊन जावळी तालुक्यातील युवा नेते सौरभ दादा ऋषिकांत शिंदे यांच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका ,पोलिस,त्याचबरोबर पत्रकार यांना  सैनीटायझर मास्क,हँण्डग्लोज व फेसशिल्ड अशा किटचे वाटप करण्यात आले.यावेळी ते मुंबईत असल्याने प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत .त्यामुळे सौरभ दादा ऋषिकांत शिंदे युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम राबविला .

            यावेळी जावळी पंचायत समितीचे माजी सभापती मोहनराव शिंदे कुडाळचे उपसरपंच गणपती कुंभार कुडाळचे ग्रामपंचायतीचे सदस्य संजय शिंदे ,दादा रासकर ,कुडाळ पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे ,समीर डांगे, बशीर डांगे, प्रमोद पवार, महेश शिंदे , धनंजय पोरे  यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते .

             वाढदिवसा निमित्त कोणताही आवाजवी खर्च न करता सध्या कोरोनाव्हायरस च्या माध्यमातून आलेल्या संकटावर मात करण्यासाठी व नागरिकांना सुरक्षिततेचा संदेश देण्याच्या उद्देशाने सौरभ दादा ऋषिकांत शिंदे यांच्या विचारातून जावळी तालुक्यामध्ये कोरणा शी लढा देण्यासाठी सुरक्षा किती वाटप करण्याय येत आहे असे यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती मोहनराव शिंदे यांनी यावेळी सांगितले.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!