जावलीच्या कृषी विभागाला सोमवारी टाळे ठोकणार- कमलाकर भोसले

पंचायत समितीच्या कृषी विभागाला सोमवारी टाळे ठोकणार- कमलाकर भोसले
कुडाळ- जावली पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या अधिकार्यानी सोयाबीन आणि भाताचे बियाणे वाटप करण्यात येणार आहे असे सांगितल्यामुळे शेकडो शेतकरी सातबारा खाते उतारा घेऊन बियाणे मिळणार या अपेक्षेने आठ दिवसापासून दररोज पंचायत समितीत जात आहेत .परंतु तीन महिन्यापासून कृषी अधिकारीच गायब, असल्याचे समजते ,त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे तर मिळालेच नाही पण स्वतःची पदरमोड करून मोकळ्या हाताने परत फिरावे लागत आहे.पंचायत समिती जावली मेढा,कृषी विभागाचा आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय अशा भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन करुन सोमवारी मेढा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मोकळ्या असलेल्या खुर्चीला चपलांचा हार घालून कृषी विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री कमलाकर भोसले यांनी दिला सोशल मिडिया वरुन प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी अगोदर वस्तुस्थितीची माहिती घ्यावी – गटविकास अधिकारी
दरम्यान शेतकरी संघटनेने आंदोलनाच्या दिलेल्या पार्श्वभूमीवर जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्या कडे प्रत्यक्ष वस्तुस्थिती बाबत विचारणा केली असता ते म्हणाले, अपूर्या माहितीच्या आधारे संबंधीतांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी अगोदर प्रत्यक्ष वस्तुस्थिती बाबत माहिती घ्यावी.
पंचायत समितीच्या कृषी विभागात 2 कृषी अधिकारी आणि 2 कृषी विस्तार अधिकारी पदे आहेत, पैकी 2 कृषी अधिकारी सेवा निवृत्त झाले आहेत, 2 विस्तार अधिकारी कार्यरत आहेत,तसेच हे दोन्ही विस्तार अधिकारी पूर्ण वेळ सेवा देत आहेत.आता पर्यंत पंचायत समितीच्या माध्यमातून 20 क्विंटल भाताचे बियाणे व
16.80 क्विंटल सोयाबीन बियाणे नियमानुसार सोशल डिस्टंसिन्ग चे पालन करत वाटप करण्यात आले आहे.
जावली पंचायत समिती मार्फत सोयाबीन बियाणे खरेदी वर थेट लाभ हस्तातरन योजना सुरु करण्यात आली आहे.कृषी सेवा केंद्र मार्फत सोयाबीन बियाणे खरेदी केल्यास खरेदीवर 50 % अनुदान आपल्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे. एका 7/12 उताऱ्यावर 15 किलो खरेदी वर प्रति किलो ३७ रु. प्रमाणे ५५५ रु. पर्यंत अनुदान जमा केले जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी १) ७/१२ व खाते उतारा २) आधारकार्ड झेरॉक्स ३) बँक पासबुक झेरॉक्स ४) सोयाबीन बियाणे खरेदी पावती ५) बियाणे पिशवी वरील लेबल ६) विहित नमुण्यात मागणी अर्ज या कागद पत्रांची पूर्तता करावी. पंचायत समितीच्या माध्यमातून खरीप हंगामासाठी उपलब्धतेनुसार सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे.असे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी स्पष्ट केले आहे.