Skip to content

जावलीत ७४ पैकी ३८ जनांची कोरोनावर मात

बातमी शेयर करा :-

जावली तालुक्यातील ७४ पैकी  ३८ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले ;२३ पैकी १५ गावे कन्टेमेंट झोन मुक्त.

कुडाळ सूर्यकांत जोशी  – गेल्या तीन महिन्यात जावली तालुक्याचा कोरोना आलेखात अनेक चढ उतार झाले. निझरेतील साखळी तोडल्यानंतर तालुका कोरोना मुक्त झाला होता. परंतु त्यानंतर मुंबई सह बाहेरून आलेल्या लोकांची संख्या वाढताच आजपर्यंत कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा तब्बल ७४ पर्यंत पोहचला आहे. पैकी ३८ जण कोरोनावर यशस्वी मात करुन घरी परतले आहेत. तर सहा जणांचा कोरोना मुळे बळी गेला आहे. कर्तव्य दक्ष प्रशासन आणि नागरीकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे तालुक्याची पुन्हा कोरोना मुक्त होण्याच्या  दिशेने घोडदौडसुरू आहे. 

             एकीकडे दिवसेदिवस वाढण्यारी कोरोना रुग्ण संख्या काळजी वाढवत आहे तर त्याच वेळी कोरोना वर यशस्वी मात करुन घरी येणाऱ्यां रुग्णांमुळे दिलासा मिळत आहे.यातूनच तालुक्यातील आज आणखी चार गावे कन्टेमेंट झोन मधून बाहेर आली आहेत.तर गांजे या गावाला कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

        तालुक्यातील केळघर तर्फ सोळशी – तेटली, आंबेघर तर्फ मेढा, रांजणी व भणंग  या गावांत कोरोना संक्रमित रूग्ण आढळले होते.परंतु त्यानंतर निर्धारित दिवसांत अन्य कोरोना संक्रमित रुग्ण या गावात आढळला नसल्याने मा.शरद पाटील सो.तहसीलदार  तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन जावली व मा. सतीश बुद्धे सो.गटविकास अधिकारी जावली यांच्या अहवाला नुसार सदर चार गावचे कन्टेमेंट झोनचे निर्बंध शिथील करण्यात येत असल्याचा आदेश मा.मिनाज मुल्ला ,उपविभागीय दंडाधिकारी तथा इंन्सिडेंट कमांडर सातारा उपविभाग यांनी जारी केला आहे.

              गेल्या दोन दिवसात तालुक्यात केवळ गांजे येथील ४८ वर्षीय पुरुष रुग्णाचा म्रत्यू पश्चात रिपोर्ट पाँसिटीव्ह आल्याने गांजे गावाला कन्टेमेंट झोन चे निर्बंध मा.मिनाज मुल्ला ,उपविभागीय दंडाधिकारी तथा इंन्सिडेंट कमांडर सातारा उपविभाग यांनी जारी केले आहेत

           आता  गांजे या गावातील हायरिस्क काँन्टेक्ट मधील लोकांच्या अहवालाकडे जावली करांचे डोळे लागले आहेत.आता पर्यंत तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ७४ वर पोहचली आहे. तर सहा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

            यापूर्वी निझरे, वरोशी ,केळघर- नांदगणे  सायगांव , मोरघर , सावरी,बेलावडे ,मुनावळे-कळकोशी, गवडी ,निपाणी तोरणेवाडी व आपटी या गावांनी कोरोनाला हद्दपार केल्याने ही गावे कन्टेमेंट झोन मधून बाहेर आली आहेत. आता या मध्ये आज आणखी चार गावांची भर पडल्याने आता एकूण पंधरा गावे कन्टेमेंट मुक्त झाली असून अजून आठ गावे कन्टेमेंट झोन मध्ये आहेत.

               एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी बरे होणारे रूग्ण साठ टक्यांहुन अधिक आहे. तालुका पुन्हा कोरोना मुक्त करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील लोकांनी घेतलेल्या खबरदारी मुळे हा आजार बाहेरून येणाऱ्या पाँसिटीव्ह रुग्णांपुरताच मर्यादित राहिला आहे. यापुढे सुद्धा लोकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.सर्वानी  नियम पाळून स्वतः ची काळजी घ्यावी व प्रशासनाला आवश्यकती माहिती वेळीच देऊन सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार शरद पाटील यांनी केले आहे।

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!