शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यामुळेच गळीत हंगाम यशस्वी -आ. शिवेंद्रसिंह राजें

अजिंक्यतारा प्रतापगडच्या गळीत हंगामाची सांगता

सूर्यकांत जोशी कुडाळ – अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग कारखान्याला ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस देऊन सहकार्य केले. त्यामुळेच कारखान्याला आपला पहिला गळीत हंगाम यशस्वी पार पाडण्यात यश मिळाले. या मध्ये अधिकारी वर्ग,कामगार, ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा व दोन्ही संचालक मंडळाचे ही महत्वपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन आ.शिवेंद्रसिंह राजें भोसले यांनी केले.
यावर्षी नव्यानेच सुरु झालेल्या सोनगाव करंदोशी ता. जावली येथील अजिंक्य तारा प्रतापगड साखर उद्योगाच्या सन2023-24 च्या गळीत हंगामाची सांगता आज करण्यात आली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आ. शिवेंद्रसिंह राजें भोसले बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे,प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, व्हा. चेअरमन ऍड शिवाजीराव मर्ढेकर व संचालक, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे व्हा. चेअरमन नामदेव सावंत व संचालक,जावली शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, जावली पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र परामणे,अजिंक्य ताराचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते प्रतापगड चे कार्यकारी संचालक राजेंद्र भिलारे तसेच सभासद व कामगार उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले यागळीत हंगामात कारखान्यात अपेक्षे प्रमाणे तीनलाख एक हजार एक्कावण मे. टन उसाचे गाळप करण्यात आले.या कारखान्याला जावली, वाई, सातारा कोरेगाव इत्यादी तालुक्यातील ऊस उत्पादकांनी या कारखान्यावर विश्वास दाखवला. आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा स्पर्धात्मक दर दिला.ऊसाचे पैसे वेळेत दिले आहेत. उर्वरित सुद्धा लवकरच होईल. प्रतापगड कारखान्याची अवस्था व्हेंटिलेटरवरील रुग्णा प्रमाणे होती आज हा रुग्ण बरा होत असून बसला आहे. येणाऱ्या काळात प्रतापगड कारखाना पूर्ण ताकातीने उभा राहून पळाला पाहिजे या साठी सर्वांनी प्रयत्न करावे.
आदरणीय लालसिंगराव शिंदे व राजेंद्र शिंदे यांनी उभा केलेला कारखाना यावर्षी पूर्ण क्षमतेने चालवला आहे.आपल्या हक्काचा प्रतापगड कारखाना सुरु झाला सर्वांनाच अभिमान आहे. येणाऱ्या काळात प्रतापगड कारखाना सर्वाधिक दर देईल असा विश्वास आ. बाबाराजेंनी व्यक्त केला.कारखान्या बाबत काहींनी शेतकऱ्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. परंतु चांगल्या कामात सहकार्य करता येत नसेल तर किमान अडचणी आणू नयेत अशी टीका आ. शिवेंद्रसिंह राजेंनी विरोधकांवर केली. आम्ही बोलण्यापेक्षा करून दाखवतो असा टोला यावेळी त्यांनी विरोधकांना लागवला. नविन हायवे मुळे जावली तालुक्यातील जनतेचे जीवन मान उंचावेल. असा विश्वास आ. बाबाराजेंनी व्यक्त केला.
अनेक अडचणी आल्या परंतु बाबाराजेंच्या मार्गदर्शनाखाली गळीत हंगाम यशस्वी करण्यात यश आले. बाबाराजेच्या कुशल नेतृत्वामुळेच प्रतापगड कारखान्याला नवी उभारी घेता आली. यापुढील गळीत हंगाम सुद्धा आपण सर्वांनी पूर्ण ताकतीने यशस्वी करूया. आ. बाबाराजेंची लोकप्रियता आणि केलेल्या विकास कामांच्या जोरावर आगामी विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी होतील या बाबत कोणतीही शंका नाही. पण आता बाबाराजेंना नामदार करायची जबाबदारी पक्षाची आहे.
प्रास्ताविक व स्वागत व्हा. चेअरमन ऍड. शिवाजीराव मर्ढेकर यांनी केले.संतोष गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.अजिंक्य तारा कारखान्याचे व्हा चेअरमन नामदेव सावंत यांनी आभार मानले.