जावली तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी महिला व बालविकास विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजना -गटविकास अधिकारी भोसले

सातारा जिल्हा परिषद सातारा (महिला व बालविकास विभाग) व पंचायत समिती ,जावली ( मेढा) कडील (महिला व बालविकास विभाग) यांचे संयुक्त विद्यमानाने
जिल्हा परिषद सेस अंदाजपत्रक सन २०२४- २५ अंतर्गत जावली तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी महिला व बालविकास विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या खालील योजना महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील शा. नि. दि. २४ जानेवारी २०१४ नुसार थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने राबविण्यात येणार आहेत. सदर योजना लाभार्थ्यांना या जाहिरातीद्वारे खालील योजना ऑनलाईन पध्दतीने इच्छुक व गरजू लाभार्थ्यांचे मागणी अर्ज मागविणेत येत आहेत.
मागणी अर्ज सादर करण्याची पध्दत
https://zpsatarascheme.com या लिंकच्या वेब पोर्टलद्वारे ऑनलाईन पध्दतीने योजनेचे नाव खालील प्रमाणे आहे.
१.सातवी ते बारावीमधील मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी मदत देणे./१२ वी पास मुलींना एम. एस.सी. आय. टी. प्रशिक्षण ,
२.इ. ५ वी ते १२ वी शाळेतील मुलींना लेडीज सायकली पुरविणे. ,
३.ग्रामीण भागातील महिलांना पिकोफॉल मशीन पुरविणे. ,
४.ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी .
योजनांतर्गत लाभार्थी पात्रतेचे निकष व देय अनुदान मर्यादा तपशील वरील योजनांसाठी अर्जदारांनी अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे व दिले जाणारे अनुदान इ. बाबतचा तपशिल सातारा जिल्हा
परिषदेच्या www.zpsatara.gov.in त संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लाभार्थीची निवड लक्षांकापेक्षा जादा अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हा परिषद स्तरावर अर्जदाराची ऑनलाईन लॉटरी पध्दतीने प्राधान्यक्रमानुसार निवड केली जाईल.योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट, २०२४ असलेने लाभार्थ्यांनी जावली(मेढा) पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधून दि. ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत मागणी अर्जाची नोंदणी करावी असे आवाहन मा.श्रीमती याशनी नागराजन ,भा.प्र.से. ,
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद,सातारा व मा.श्री मनोज भोसले गट विकास अधिकारी वर्ग १ ,पंचायत समिती जावली (मेढा) यांचेकडून करण्यात आले आहे.