Skip to content

कुडाळ येथे बंद घराचे कुलूप तोडून साडेतीन लाखांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

बातमी शेयर करा :-

कुडाळ येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात घरफोडी
३ लाख ३० हजारांचे सोन्याचे दागिन्यासह रोख रक्कम नेली चोरून

कुडाळ

      जावळी तालुक्यातील कुडाळ येथील कृष्णा सखाराम शेवते या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात घोरफोडी झाली असून या घरफोडीत २ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ८० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३० हजार रुपयांची चोरी झाली आहे.

    याबाबत मेढा पोलीस ठाण्यातुन  देण्यात आलेली सविस्तर माहिती अशी की कृष्णा शेवते हे ३ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट दरम्यान  बाहेरगावी गेलेले असताना त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला.घरातील लाकडी कपाटाचा कडीकोंयडा उचकटून या कपाटातील २ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे ५ तोळे वजनाची बोरमाळ व कपाटात ठेवलेले ८० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरून नेला आहे.

    याबाबत कृष्णा शेवते यांनी मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्तीवर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे  यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक यादव या घोरफोडीचा पुढील तपास करत आहेत.



"दरम्यान या घरफोडी प्रकरणी मेढा पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून त्याच्याकडे या गुन्ह्याबाबत कसून तपास सुरू आहे."

पृथ्वीराज ताटे 

  सहाय्यक पोलीस निरीक्षक मेढा
बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!