कुडाळ येथे बापाच्याच घरात दिवट्याने केली घरफोडी

**
*दागिन्यासह रोख रक्कम दिवत्याकडून पोलिसांनी केली हस्तगत**
कुडाळ
जावळी तालुक्यातील कुडाळ येथील कृष्णा सखाराम शेवते या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात घोरफोडी झाली होती.या घरफोडीत २ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ८० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३० हजार रुपयांची चोरी झाली होती .
याबाबत मेढा पोलीस ठाण्यात कृष्णा शेवते यांनी तक्रार नोंदवली होती. त्या अनुषंगाने तपासा अंती ही घर फोडी वडिलांपासून स्वतंत्र राहत असलेल्या मुलानेच केली असावी असा संशय पोलिसांना होता. त्यानुसार पोलिसांनी निलेश शेवते याला ताब्यात घेतले होते. यामध्ये सपोनि पृथ्वीराज ताटे यांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी निलेश शेवते याच्या कडून चोरलेले दागिने व रोख रक्कम हस्तगत केली. निलेश शेवते याला न्यायालयाने 12आगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी 12 तासाच्या आत लावल्या बद्दल सपोनि पृथ्वीराज ताटे व त्यांच्या टीमचे अभिनंदन करण्यात येत आहे