Skip to content

पावसाने उघडीप दिल्याने शेतातील आंतरमशागतींना वेग :पण शेतकरी मित्रानो विषारी सापांपासून सावधान:**

बातमी शेयर करा :-

फोटो -सर्जापूर येथे राजू मोहिते यांच्या सोयाबीनच्या शेतात लपलेला भला मोठा घोणस सर्प.(सूर्यकांत जोशी )

सूर्यकांत जोशी कुडाळ -गेले महिनाभर अविश्रांत कोसळत असलेल्या पावसाने आता उघडीप दिली आहे. पावसामुळे शेतातील अंतर मशागती करता न आल्याने.पिकांसोबत तृन मोठ्या प्रमाणात उगवले आहे. आता पाऊस थांबला असल्याने भांगळणी, खुरपणी औषध फवारणी यासारख्या कामांना वेग आला आहे. परंतु शेतकरी मित्रांनो सावधान. सापांना शेतकऱ्यांचा मित्र समजले जात असले तरी या दिवसात अशा दाट पिकामध्ये विविध जातीच्या सापांचा हा प्रजनन काळ असतो. यामध्ये विशेषतः घोणस, नाग, फुरसे, मन्यार अशा विषारी सापांचा ही समावेश असतो. नजरचुकीने आपला धक्का लागला  तर हेच मित्र आपले शत्रू बनून जीवावर उठू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात काम करताना विशेष काळजी घ्यावी.

           याचा प्रत्यय जावली तालुक्यातील सर्जापूर येथील शेतकरी राजू मोहिते पाटील यांना नुकताच आला. ते आपल्या सोयाबीनच्या शेतात  औषध फवारणी करत असताना दाट पिकामध्ये घोणस जातीचा साप आढळला. या सापाचे नुकतीच वेन झाले होते. परंतु सुदैवाने राजू यांच्या त्वरित लक्षात आल्याने ते ताबडतोब तिथून बाजूला सरकले नाहीतर अनर्थ घडू शकला असता.विशेषतः सोयाबीन अथवा भुईमूग या सारख्या दाट पिकात घोणस जातीचा अत्यंत विषारी साप आढळून येतो.

           दाट पिकात अंतर मशागत तसेच काढनी करत असताना योग्य खबरदारी घ्यावी. पायात गम बूट वापरावे अथवा खताची पोती मांडी पर्यंत पायाला गुंडाळावी जेणे करून पायाला सर्प दंश होणार नाही.या बरोबरच योग्य खबरदारी घेऊन शेतात काम करावे असे आवाहन प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक आनंदराव मोहिते पाटील यांनी  केले आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!