Skip to content

जावली तालुका बाजार समिती आवारामध्ये भुसार मालाची खरेदी विक्री सुरु – सभापती श्री.जयदिप शिंदे

बातमी शेयर करा :-


कुडाळ -कृषि उत्पन्न बाजार समिती जावलीचे माध्यमातुन मुख्य बाजार आवार कुडाळ येथे भुसार मार्केट सुरु करणेबाबत बाजार समितीचे सभापती, उपसभापती ,सदस्य व व्यापारी यांच्यामध्ये बैठक झाली. सदर बैठकीमध्ये बाजार समितीचे आवारामध्ये दररोज खरेदी विक्री व्यवहार करणेचा निर्णय घेणेत आला. बाजार समितीचे कुडाळ येथील आवारामध्ये शेतमाल खरेदी सुरु झालेने शेतकऱ्यांना स्पर्धात्मक व रास्त भाव मिळणार आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाचे व्यवहार बाजार समितीच्या माध्यमातुन करावेत असे आवाहन श्री.जयदिप शिंदे यांनी केले.
बाजार समितीचे कार्यक्षेत्रात फिरते व्यापारी यांचेकडून शेतकऱ्यांची रोख स्वरुपात अगर काटामारी अशा प्रकारची फसवणुक केलेचे प्रकार होत असतात . तसेच संबंधीत व्यापाऱ्याने बाजार समितीचे अनुज्ञप्ती (लायसन्स) घेतले असलेबाबत खात्री शेतकरी करत नाहीत. सदरची फसवणुक टाळावी, शेतकऱ्यांना स्पर्धात्मक व रास्त भाव मिळावा, त्याच्या शेतीमालाचे चोख वजन व्हावे याकरीता बाजार समितीचे बाजार आवारामध्ये शेतमाल खरेदी विक्री सुरु करणेत आलेली आहे. तरी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल निवडक , स्वच्छ व वाळवुन आणावा असे बाजार समितीचे सचिव श्री.महेश देशमुख यांनी सुचीत केले.
याप्रसंगी बाजार समितीचे सभापती जयदिप शिंदे, उपसभापती हेमंत शिंदे, सदस्य राजेंद्र भिलारे, बुवासाहेब पिसाळ, प्रमोद शिंदे, मनेष फरांदे , बाजार समितीचे माजी उपसभापती मालोजीराव शिंदे , उत्तम शेलार, राजाराम इंदलकर, शांताराम शिंदे व्यापारी व सचिव श्री.महेश देशमुख उपस्थित होते.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!