Skip to content

अजिंक्यतारा -प्रतापगड चा गळीत हंगाम यशस्वी करा – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले : विरोधक कर्तृत्व शून्य : आ.शिवेंद्रसिंहराजेंचा विरोधकांवर निशाणा

बातमी शेयर करा :-

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील कृषी उद्योग क्षेत्राला चालना देणारा प्रतापगड सहकारी साखर कारखाना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहकार्य अत्यावश्यक असून कारखान्याला जास्तीत जास्त ऊस देऊन आगामी गळीत हंगाम यशस्वी करावा असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. यावेळी त्यांनी विरोधक हे कर्तुत्व शून्य असून त्यांना शून्यावरच ठेवा असा निशाणा विरोधकांवर साधला. अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या सन 2024- 25 च्या गळीत हंगामासाठी बॉयलर अग्नी प्रदीपन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात आमदार भोसले बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे,अजिंक्य तारा सहकारी साखर कारखाना चेअरमन यशवंत साळुंखे,प्रतापगड सहकारी साखर कारखाना चेअरमन सौरभ शिंदे, माजी चेअरमन श्रीमती सुमित्रा शिंदे,व्हा. चेअरमन नामदेव सावंत, व्हा. चेअरमन ऍड.शिवाजीराव मर्ढेकर, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, राजेंद्र भिलारे,बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानादेव रांजणेvउपस्थित होते. आमदार भोसले म्हणाले, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लादून विरोधकांनी कारखान्याला आर्थिक अडचणीच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न केला. परंतु सभासदांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. प्रतापगड सहकारी साखर कारखान्याला सुरुवातीपासूनच अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. हा कारखाना सुरळीत सुरू राहावा यासाठीच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने मदतीचा हात दिला आहे. हा कारखाना लवकरात लवकर कर्जमुक्त होऊन स्वबळावर चालावा ऊस उत्पादक शेतकरी सभासद, कामगार यांच्यासह सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कायम या ठिकाणी राहणार नसून पुढील काही वर्षात ही जबाबदारी प्रतापगड कारखान्यालाच पेलावी लागणार आहे. गतवर्षीच्या गळीत हंगामात सव्वातीन लाख मॅट्रिक टन उसाचे गाळप करून प्रतापगडचा गळीत हंगाम यशस्वी केला आहे. गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे उसाचे क्षेत्र घटले आहे अशा परिस्थितीत यावर्षीचा गळीत हंगाम यशस्वी पार पाडणे हे आव्हानात्मक आहे. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र कमी असल्याने बाहेर कारखाने येथील ऊस नेहण्याचा प्रयत्न करतील. परंतु ज्यावेळी त्यांच्या क्षेत्रातील ऊस उत्पादन वाढेल त्यावेळी ते इकडे फिरकणार नाहीत. त्यामुळे आपल्या हक्काचा प्रतापगड कारखाना सुरू राहणे आवश्यक आहे. आगामी निवडणुकीत आपला विजय निश्चितच आहे. तरीसुद्धा विरोधकांना कमी लेखून कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये. आपल्या गावातून जास्तीत जास्त मतदान आपल्याला होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या प्रगतीच्या आड येणाऱ्या विरोधकांना थारा देऊ नये असे आवाहन आमदार भोसले यांनी केले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुंमरे यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आव्हान केले.प्रतापगड सहकारी साखर कारखाना हा जावली तालुक्याचा मानबिंदू आहे. हा कारखाना सक्षमपणे चालवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याच्या आवश्यकता आहे. माजी आमदार लालसिंगराव शिंदे काका व संस्थापक चेअरमन राजेंद्र शिंदे यांनी कारखान्याच्या माध्यमातून जावली तालुक्याचे विकासाचे स्वप्न पाहिले तसेच कारखान्याच्या माध्यमातून शेकडो तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली काकांचे वय यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी या कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे. प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी प्रास्ताविक करून आगामी गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. मनोगत रवींद्र परामणे, प्रशांत तरडे,मच्छिन्द्र मुळीक,अरुणा शिर्के,समाधान पोफळे, विजय सपकाळयांनी मनोगत व्यक्त केले. संचालक राजेंद्र फरांदे पाटील यांनी आभार मानले.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!