Skip to content

माजी सनदी अधिकारी अविनाश सुभेदार यांची कुडाळ गावाला सदिच्छा भेट : कुडाळच्या मातीचे ऋण अविस्मरणीय -अविनाश सुभेदार

बातमी शेयर करा :-

सूर्यकांत जोशी कुडाळ – वडिलांच्या पोलीस दलातील सेवेनिमित्त बालपणी कुडाळ येथे राहण्याचे भाग्य लाभले. आयुष्याच्या सुरुवातीला मिळालेली बाल सवंगड्यांची साथ ही अविस्मरणीय आहे तसेच येथील प्राथमिक शाळेच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान व संस्कार हे जीवनात मिळालेल्या यशाच्या गुरु किल्ली प्रमाणे आहेत. त्यामुळे येथील मातीचे ऋण कधीही विसरता येणार नाहीत असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचे माजी सनदी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले. **अविनाश सुभेदार यांनी कुडाळ येथे नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी 55 वर्षांपूर्वीच्या आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी आपले कुडाळ येथील प्राथमिक शाळेत सुरुवातीचे झाले आहे असे सांगून एकोणीसशे बहाहत्तर साली माझा चौथी मध्ये प्रथम क्रमांक आला होता. आणि ती बातमी प्रसिद्ध दैनिक ऐक्य मध्ये प्रसिद्ध झाली होती. दैनिक ऐक्य मधील ती बातमी दाखवत माझ्या वडिलांनी संपूर्ण गावात पेढे वाटले होते. या बातमीच्या माध्यमातून दैनिक ऐक्यने पाठीवर मारलेली शाब्बासकीची थाप जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी ठरल्याचे सांगत सुभेदार यांनी दैनिक ऐक्यची प्रशंसा केली** अविनाश सुभेदार यांनी आपल्या कार्यकाळात जि प मुख्य कार्यकारी अधिकारी, कलेक्टर, मुख्यमंत्र्यांचे उपसचिव अशी अनेक पदे भूषवली आहेत. असे असून कुडाळ शाळेत शिक्षण पूर्ण केलेल्या आठवणीला 54 वर्षे पूर्ण होऊन ही त्यांची नाळ इथल्या मातीशी जोडलेली आहे. या भेटी प्रसंगी त्यांनी शाळेतील बालपणीच्या मित्रांसोबत आठवणी जागवल्या. नोकरीनिमित्त त्यांचे वडील फौजदार सुभेदार यांचे काही काळ कुडाळ मध्ये वास्तव्य असताना त्यांनी या शाळेमध्ये शिक्षण घेतल्याचे नमूद केले. शालेय स्पर्धांमध्ये घेतलेला सहभाग, चौथी केंद्र परीक्षेत आलेला पहिला नंबर, दैनिक ऐक्यने त्याकाळी फोटोसह छापलेली बातमी , गावातील नाटकांमध्ये वयाच्या दहाव्या वर्षी घेतलेला सहभाग , दर शनिवारी शेण व पाणी आणून सारवलेली शाळा केलेले शेती काम इत्यादी अशा अनेक प्रेरणादायी आठवणी त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या .या सर्वांचा संदर्भ त्यांनी लिहिलेल्या सुभेदारी या आत्मचरित्रामध्ये केलेला आहे. यावेळी त्यांनी शालेय परिसर तसेच शालेय प्रशासन व विद्यार्थी गुणवत्ता यांची पाहणी करून कुडाळ शाळेच्या दर्जा विषयी गौरव उद्गार काढले .तसेच शाळेस पन्नास हजार रुपये शालेय विकासासाठी दिली व माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्याच्या सूचना करून त्या मेळाव्याला मी पुन्हा येईन असा शब्दही दिला. त्यानंतर अविनाश सुभेदार यांनी कुडाळ येथे लोक सहभागातून साकारलेल्या पिंपळबन या नैसर्गिक सामाजिक उपक्रमास भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.या याप्रसंगी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी तसेच शाळेतील शिक्षक गावातील त्यांच्यासोबत शिक्षण घेणारे त्यांचे शिक्षण प्रेमी ग्रामस्थ मित्र, पिंपळबन सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!