सूर्यकांत जोशी कुडाळ – सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीतील भाजपाचे अधिकृत उमेदवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आखाडे तालुका जावली येथे शुक्रवार दिनांक 15 रोजी दुपारी चार वाजता म्हसवे गटातील महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेरी एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी होणारे या मेळाव्याला श्रीमंत छत्रपती वेदांतिकाराजे भोसले, सौ अर्चना रांजणे, सौ अंकिता शिंदे यांचे प्रमुख उपस्थिती आहे.
या विधानसभा निवडणुकीत महिलांचे शंभर टक्के मतदान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना होणे अपेक्षित आहे. या मेळाव्याला सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी सभापती अरुणा शिर्के व क्रांती पवार यांनी केले आहे.