मंगल कार्यालयात करा शुभमंगल ;पण रहा सावधान

आता मंगल कार्यालयात करा शुभमंगल ;पण रहा सावधान
सूर्यकांत जोशी कुडाळ – विना वातानुकूलित मंगल कार्यालय,हाँल, सभागृह, घर , घराचा परिसर व लाँनवर पन्नास लोकांपर्यंत नियम व अटींवर शुभमंगल करण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परवानगी दिली आहे. विवाह ठिकाणच्या संबंधित पोलिस ठाण्याचा ना हरकत दाखला घेऊन तहसीलदारांमार्फत विवाहासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे.
मंगलकार्यालयात येताना सर्वांचे थर्मल स्क्रीनिंग करणे अनिवार्य आहे. तसेच सर्वांच्या मोबाईल मध्ये आरोग्य सेतू अँप डाऊनलोड करणे बंधनकारक आहे. सोशल डिस्टेन्सींगचा , मास्क व सँनिटायझर चा वापर करावा लागेल. स्वच्छता ग्रहे, भोजनालय तसेच आवश्यक ठिकाणी हातधुण्यासाठी सुविधा असल्या पाहिजेत .अशा विविध अटींवर मंगलकार्यालय व लाँनवर लग्न लावण्यासाठी परवानगी मिळणार आहे.तसेच कार्यालयातील लिफ्टचा वापर करता येणार नाही.१% सोडियम हायपो क्लोराईड ने मंगलकार्यालय स्वच्छ करावे लागणार आहे. कोविड १९ पासून सुरक्षित रहाण्यासाठी अशा विविध अटींचे पालन करणे आवश्यक आहे.
केवळ शासनाचे नियम म्हणून नव्हे तर स्वतः ची, परिवारातील सदस्यांची व आपल्या आप्तेष्टांची काळजी म्हणून सर्वांनी शुभमंगल करताना सदैव सावध रहावे लागणार आहे.