Skip to content

प्रतापगड कारखान्याच्या स्वीकृत संचालक पदी लक्ष्मण पवार यांची निवड

बातमी शेयर करा :-

सूर्यकांत जोशी कुडाळ – सोनगाव करंदोशी तालुका जावली येथील प्रतापगड सह. साखर कारखाना च्या *स्वीकृत संचालक* पदी सरताळे गावचे सुपूत्र *लक्ष्मण आनंदराव पवार*(बापु) यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी दिली.

प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत लक्ष्मण पवार यांचे स्वीकृत संचालक पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी चेअरमन सौरभ शिंदे, माजी चेअरमन सुनेत्रा शिंदे, व्हाईस चेअरमन एडवोकेट शिवाजीराव मर्ढेकर, संचालक अंकुशराव शिवनकर, राजेंद्र शिंदे,आनंदराव मोहिते, दादा पाटील, आनंदराव जुनघरे व संचालक मंडळातील सर्व सदस्य प्रभारी कार्यकारी संचालक राजेंद्र भिलारे उपस्थित होते.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!