मेढा येथील जनावरांचा वार्षिक बाजार गुरुवार दि.20 मार्च पासुन सुरु – जयदिप शिंदे .

सूर्यकांत जोशी कुडाळ – गेल्या अनेक वर्षापासुन रंगपंचमी ते पाडवा या दरम्यान मेढा ता.जावली जि.सातारा येथे जनावरांचा वार्षीक बाजार भरविला जातो. कृषि उत्पन्न बाजार समिती जावली , नगरपंचायत मेढा व पंचायत समिती जावली यांचे संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे जनावरांचा जंगी वार्षिक बाजार गुरुवार दि.20/03/2025 ते दि.29/03/2025 अखेर आयोजीत केला आहे या वार्षीक बाजारासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यातुन जातीवंत जनावरांचे विक्रेते मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. या बाजाराकरीता कृषि उत्पन्न बाजार समिती जावली यांचेकडुन दिवाबत्ती, जातीवंत जनावरांचे संमेलन भरविणेत येणार आहे. लक्ष्मी चॅरीटेबल ट्रस्ट , श्री.विनोद दादा पार्टे यांचे मार्फत शेतकरी , व्यापारी व जनावरे यांना मोफत पिण्याचे पाण्याची सोय केलेली आहे. तसेच या जनावरे बाजारामध्ये शेती उपयोगी औजारे विक्रीसाठी येणार असलेने शेतकऱ्यांना नवनविन औजारे व शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती श्री.जयदिप शिंदे यांनी केले आहे.