अवैध दारू विक्रेत्यांवर मेढा पोलिसांच्या जावली तालुक्यात विविध ठिकाणी धाडी.: अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईबाबत सातत्य ठेवल्याने समाज माध्यमातून पोलिसांचे कौतुक

सूर्यकांत जोशी कुडाळ – दारूमुक्त तालुका म्हणून नावलौकिक मिळवलेल्या जावली तालुक्यात अवैधरित्या दारू विक्री करून स्वतःचे उखळ पांढरे करणाऱ्या दारू विक्रेत्यांवर मेढा पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरू ठेवले आहे. मेढा,कुडाळ,केळघर, करहर यासह अवैध दारू विक्री होत असणाऱ्या विविध ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकून अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. जावली तालुक्यात होत असणाऱ्या अवैध दारू विक्री बाबत मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी सातत्य ठेवल्याबद्दल त्यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्यांच्या कडून अभिनंदन करण्यात येत आहे.
करहर येथे अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.14/04/2025 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मौजे करहर ता. जावली जि. सातारा येथे गावचे हद्दीत खर्शीबारमुरे गावाकडे जाणारे रोड लगत असणाऱ्या लाकडी वखारीच्या आडोशाला इसम नामे लक्ष्मण पांडुरंग वाघे रा. आखाडे, ता. जावली जि. सातारा हा स्वतःच्या आर्थिक फायदा करिता बेकायदा बिगर परवाना प्रोव्हिच्या मालाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःचे कब्जात जवळ बाळगले स्थितीत मिळून आला म्हणून फिर्यादी यांची महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम 65 (e)प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पो.हवा. 389 जायगुडे करत आहेत.
केळघर येथे अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई
या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.14/4/2025 रोजी 12.30वा. चे सुमारास मौजे केळघर तालुका जावली जिल्हा सातारा गावचे हद्दीत जलाराम हॉटेलच्या शेजारी असलेले भंगाराचे दुकानाचे पत्र्याचे शेडच्या आडोशाला नामे विक्रम चंद्रकांत दळवी राहणार केळघर तालुका जावली जिल्हा सातारा हा स्वतःचे आर्थिक फायद्या करता बेकायदेशीर विनापरवाना देशी दारूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने प्रोविमाल एकूण किंमत रुपये 770 रू. किंमतीचा प्रोव्हि. माल बाळगले स्थितीत मिळून आला म्हणून माझी त्याचे विरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे सरकार तर्फे फिर्याद आहे.अधिक तपास पोलीस नाईक 2684 बेसके करत आहेत.
मेढा येथे अवैध दारू विक्रेत्यावर पोलिसांची कारवाई
दि.14/4/2025 रोजी दुपारी एक वा. चे सुमारास मौजे मेढा गावच्या हद्दीत मेढा ते कुडाळ जाणारे रोडवर दूंदळे किराणा दुकानाचे शेजारील बोळामध्ये ईसम नामे गजानन सदाशिव तांबोळी वय 50 वर्ष राहणार देशमुख आळी तालुका जावली जिल्हा सातारा स्वतःचे आर्थिक फायद्या करता बेकायदेशीर विनापरवाना देशी दारूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने प्रोविमाल एकूण किंमत रुपये 840 रू. किंमतीचा प्रोव्हि. माल बाळगले स्थितीत मिळून आला म्हणून माझी त्याचे विरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे सरकार तर्फे फिर्याद आहे. तत्पूर्वी सकाळी 10.30 वा. चे सुमारास मौजे मेढा ता. जावली गावचे हद्दीमधील ए.टी. स्टॅन्ड समोर रोडलगत असले टपरीचे आडोशाला आकाश संतोष चव्हाण वय 20 वर्षे, रा. गांधीनगर मेढा, ता. जावली, जि. सातारा हा गणेश विष्णुदास धनावडे याचे सांगण्यावरुन स्वताः चे आर्थिक फायदेकरीता बेकायदेशीर, विनापरवाना देशी दारुची चोटी विक्री करणेच्या उद्देशाने प्रोव्ही माल एकुण किंमत रुपये 1365/-रू जवळ बाळगले स्थितीत मिळुन आला आहे. म्हणुन माझी त्याचेविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई) प्रमाणे सरकार तर्फे कायदेशीर फिर्याद आहे. अधिक तपास पोलीस हवालदार ब. न 2212 उदागेकरत आहेत.
कुडाळ येथे अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई
दि.14/04/2025 रोजी सायंकाळी सहा च्या सुमारास मौजे कुडाळ ता. जावली जि. सातारा गावचे हद्दीत कुडाळी नदीचे पुलाचे अलीकडे असले कचरा डेपोचे झाडाझुडपाचे आडोशाला इसम नामे सनी दत्तू पवार रा. इंदिरानगर कुडाळ, ता. जावली जि. सातारा हा स्वतःच्या आर्थिक फायदा करिता बेकायदा बिगर परवाना प्रोव्हिच्या मालाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःचे कब्जात जवळ बाळगले स्थितीत मिळून आला म्हणून फिर्यादी यांची महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम 65 (e)प्रमाणे फिर्याद आहे.
तपासी अंमलदार :- ASI व्ही. आर. शिंगटे अधिक तपास करत आहेत.