Skip to content

प्रकाश भोसले यांच्या सारख्या जुन्या जाणत्या नेत्यांचे मार्गदर्शन मिळणे महत्वाचे — शिवेंद्रसिंहराजे

बातमी शेयर करा :-

फोटो — श्री प्रकाश भोसले यांना शुभेच्छा देताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व मान्यवर

प्रकाश भोसले यांच्या सारख्या जुन्या जाणत्या नेत्यांचे मार्गदर्शन मिळणे महत्वाचे — शिवेंद्रसिंहराजे भोसले

कुडाळ-: जावळी तालुक्यातील रानगेघर गावचे सुपुत्र व ज्येष्ठ नेते प्रकाश भोसले यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे व्यक्तिमत्व आणि नेतृत्व नव्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी हवे असल्याने त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नियोजन करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन महत्वाचे आहे. असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी करहर तालुका जावळी येथे ७१ व्या वाढदिवसानिमित्त श्री प्रकाश भोसले यांना शुभेच्छा देताना केले.

यावेळी श्री भोसले कुटुंबीयांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, उद्योजक दत्ता गावडे, युवा नेते सौरभ शिंदे, शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, भाजप जावळी तालुका अध्यक्ष संदीप परामणे, अजित इंदलकर, ज्येष्ठ पत्रकार रविकांत बेलोशे, संतोष शिराळे, दत्ता पवार, अजित जगताप, भाऊसाहेब जंगम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जावळी तालुक्यातील वाड्या वस्तीतील मतदारांनी विश्वास व्यक्त करून विक्रमी मतदान केलेले आहे. विधानसभेत पाच वेळा संधी दिल्यानंतर आता मंत्रिपद मिळाले आहे. पूर्वी दुसरीकडे जाऊन आपल्याला कामे मागावी लागत होती. आता आपल्याकडेच कामे देण्याचे मंत्री म्हणून अधिकार मिळाले आहेत. सर्वांनी ताकद दिल्यामुळेच मी मंत्री झालो आहे. आपल्या हक्काचे मंत्रालयात केबिन असल्यामुळे आपल्या सर्वांच्या अशा अपेक्षा पूर्ण केल्या जातील. पर्यटन विभागामार्फत पर्यटन वाढीसाठी मार्ली ते रानगेघर, इंदवली, करंडी ,दरे आदी गावच्या रस्त्याचा प्रश्नही मार्गी लावण्यात येईल असे त्यांनी सांगितले.सुर्वेवाडीचाही रस्ता आपल्यालाच करावा लागणार आहे. तोही पूर्ण केला जाईल. असे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आमदारकीसाठी ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे. त्यांच्यासाठी आता आपल्या सर्वांनाच त्यांना निवडून देण्यासाठी पळावे लागणार आहे. त्यामुळे विकास कामातूनच आपण सर्वांपर्यंत पोहोचलेलो आहे. अजून काही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले. यावेळी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने मंत्री महोदय नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचाही गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला सरपंच आदिनाथ मोरे, रोहिदास भोसले, विनोद करंजकर, जीवन भोसले, विलास भोसले, सूर्यकांत करंजकर, शशिकांत करंजकर, अविनाश भोसले, हनुमंत भोसले व करंडी, रानगेघर, दरे, करहर, कुडाळ परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, श्री प्रकाश भोसले यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी मंत्री व आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार सदाशिव सपकाळ तसेच सातारा जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी रानगेघर येथे जाऊन श्री. प्रकाश भाऊ भोसले यांना शुभेच्छा दिल्या. राजकीय पटलावर अभिमन्यू सारखे चक्रव्यूह भेदणारे श्री प्रकाश भोसले सध्या विविध विषयावरील पुस्तके वाचन करून आजही जावळी तालुक्यात समाजामध्ये प्रबोधन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने भविष्यातही मोठे क्रांती करण्याची धमक असल्याचे अनेक मान्यवरांनी सांगितले .————— जावळी तालुक्यातील मंत्री महोदयांच्या दौऱ्यामध्ये सातारा व परिसरातील ठराविक व मोजकेच कार्यकर्ते असल्याने जावळीतील स्थानिक निष्ठावंत व सच्चा कार्यकर्त्यांना मंत्री महोदयांशी जवळीक साधण्यास अडचण होत असल्याची भावना महायुतीच्या समर्थकांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. याची मंत्री महोदयांनी नोंद घ्यावी अशी विनंती केली आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!