Skip to content

ग्रामपंचायत आरक्षण सोडतीनंतर जावली तालुक्यात गाव कारभाऱ्यांची लगबग सुरू. 125 पैकी 63 ग्रामपंचायतवर महिलाराज

बातमी शेयर करा :-

सूर्यकांत जोशी कुडाळ – २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या सातारा जिल्ह्यात जावली तालुक्यातील तब्बल १२५ ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत शुक्रवारी अतिशय शांततेत व सुरळीत पार पडली. १२५ पैकी तब्बल ६३ ठिकाणी महिलाराज आले असून यामध्ये सर्वसाधारण महिला ४० ना. मा. प्रवर्ग महिला १७, अनुसूचित जाती ५, अनुसूचित जमाती १ अशा एकूण ६३ महिलांना सरपंचपदाची लॉटरी लागणार आहे.

जावली पंचायत समितीच्या सभागृहात ही आरक्षण सोडत पार पडली. निवडणूक नियंत्रण अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी विकास व्यवहारे व तहसीलदार हनमंत कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. यावेळी नायब तहसीलदार सुनील मुनाळे आदी उपस्थित होते जावली तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ही आरक्षण सोडत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पहिल्यांदा अनुसूचित जातीच्या ९ पैकी ५ ठिकाणी महिला आरक्षण तर ४ ठिकाणी अनुसूचित जातीचे आरक्षण जाहीर करण्यात आले. अनुसूचित जमातीसाठी असलेल्या २ पैकी १ जागेवरही महिला राखीव आरक्षण जाहीर करण्यात आले. इतर मागासवर्गीय तथा ना. मा. प्रवर्गमध्ये १७ ठिकाणी महिला व इतर १७ ठिकाणी ना. मा. प्रवर्ग आरक्षण जाहीर करण्यात आले. सर्वसाधारणच्या एकूण ४० ठिकाणी सर्वसाधारण महिला तर ४० ग्रामपंचायत सरपंच पद हे सर्वसाधारणसाठी खुल्या असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जाती महिला सरपंचपदासाठी दरे बुद्रुक, वरोशी, आखाडे, पिंपळी, करंजे, अनुसूचित जमातीसाठी सायगाव ही गावे आरक्षित झाली. अनुसूचित जाती साठी रांजणी ,दुंद, सावली भणंग, अनुसूचित जमातीसाठी केळघर या ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या. नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला सरपंचपदासाठी महू, सनपाने, आलेवाडी, आगलावेवाडी, काळोशी, गांजे, भामघर, म्हाते खुर्द, आरडे, पवारवाडी, बिभवी, करंडी तर्फ मेढा, निझरे, केळघर तर्फ सोळशी, कोळघर, बाहुले, बेलावडे या ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या. सर्वसाधारण महिलाना चाळीस सरपंच पदे शिंदेवाडी, दापवडी, विवर, भोगवली तर्फ कुडाळ, कावडी, रामवाडी, कोलेवाडी, भालेघर, रांनगेघर, करंदोशी, भिवडी, रायगाव, महामुलकरवाडी, मोरघर, नरफदेव, मोरावळे, ओझरे, एकीव, कुसुंबी, कसबे, बामनोली, उंबरेवाडी, आपटी, दिवदेव, पुनवडी, केडंबे, वाळंजवाडी, म्हाते बुद्रुक, वाकी, गाडवली, पुनर्वसन बेलोशी, मरडमुरे, वेळे, निपाणी, म्हसवे, कुंभारगणी,वाहगाव, सरताळे, केसकरवाडी, अंधारी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी काटवली, घोटेघर, वालुथ, जरेवाडी, पानस, पुनर्वसन बामनोली तर्फ कुडाळ, महिगाव, कारगाव, गवडी, मुकवली आसनी, मार्ली, खर्शी तर्फे कुडाळ, जवळवाडी, तळोशी, कुरळोशी, गोंदेमाळ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सर्वसाधारणसाठी प्रवर्गासाठी चाळीस सरपंच पदे रुईघर, खर्शीमुरे, आखेगणी, पानस, करहर, आंबेघर तर्फ कुडाळ, हातगेघर, हुमगाव, सोमरडी, शेते, करंदी तर्फ कुडाळ, धोंडेवाडी, सर्जापूर, सोनगाव, आनेवाडी, दुदुरकरवाडी, दरे खुर्द, केंजळ, रिटकवली, धनकवडी, मालचौंडी, सांगवी तर्फ मेढा, पिंपरी तर्फ मेढा, तेटली, शेंबडी, मुनावळे, चोरांबे, आंबेघर तर्फ मेढा, डांगरेघर, भुतेघर, बोंडारवाडी, रेगडीवाडी, नांदगणे व ओखवडी, भोगवली तर्फ मेढा, वागदरे, गाळदेव, इंदवली तर्फ कुडाळ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!