ना. शिवेंद्रसिंह राजेंची विकासकामे आणि भाजपाचे कमळ जावलीतल्या घराघरात पोहोचवणार संदीप परामणे
July 10, 2025/


सूर्यकांत जोशी कुडाळ -महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मला तालुकाध्यक्ष पदाची संधी देऊन माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला आहे. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी जीवाचे रान करून महाराज साहेबांचे विचार आणि त्यांच्या माध्यमातून होत असणारी विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्ह जावली तालुक्याच्या घराघरात पोहोचवणार असल्याचा निर्धार भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप परामणे यांनी व्यक्त केला.
ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे माध्यमातून तालुक्यातील सरताळे येथील ज्येष्ठ नागरीक यांना छत्री वाटप समारंभ चा शुभारंभ करताना परामणे बोलत होते.यावेळी भाजप चे तालुका अल्पसंख्यक सेल अध्यक्ष समीर आतार सरताळे गावचे ग्रामस्थ पदाधिकारी व बाबाराजे समर्थक उपस्थित जनसमुदाय होते
[the_ad id="4264"]