Skip to content

जावलीत अवैध धंद्यावर वर पोलिसांचे धाडसत्र

बातमी शेयर करा :-

जावलीत अवैध धंद्यांवर पोलिसांचे धाड सत्र सुरुच

 सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात मेढा पोलिसांनी अवैध धंद्यावर धाडसत्र सुरू केले आहे. शनिवारी तिघांवर तडीपारीची कारवाई पूर्ण होताच दुपारी कुडाळ येथील मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली.

           वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी एक पथक तयार करून मेढा पोलिस ठाणे अंकित कुडाळ पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील कारवाई साठी पाठवले होते.या पथकाने कुडाळ पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे,सूर्यकांत शिंदे, इम्रान मेटकरी यांना कारवात सहभागी करुन घेऊन कुडाळ गावचे हद्दीतील वारागडे आळी येथील मोहन दादू जाधव यांच्या घराच्या पाठीमागे भिंतीच्या आडोशाला बोळात कल्याण नावाचा मटका जुगार लोकांच्या कडुन पैसै स्विकारून जुगार घेतला जात असल्याचे आढळून आल्याने वामण श्रीरंग गंगावणे वय  ५५,संतोष दत्तात्रय शिंदे वय  ४०,  शैलेंद्र चंद्रकांत म्हेत्रे -५३,हणमंत शंकर शिंदे वय  ६५  हे राहणार सर्व कुडाळ,व प्रकाश शंकर गंगावणे वय  ४७ रा. करंदी यांना रंगेहाथ जागीच पकडुन त्यांच्या कब्जातून लोकांच्या कडून कल्याण नावाचा मटका खेळण्यासाठी  घेतलेली रोख रक्कम रुपये  २१४६६  व जुगाराचे साहित्य हसतगत करून पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

              यापुढेही जावली तालुक्यात अशीच कारवाई सुरु राहणार असल्याचा इशारा वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी  अजित टिके यांनी दिला आहे।.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!