वेळेत उपचार न मिळाल्याने जावलीत सर्प दंशाने एकाचा म्रुत्यु,

वेळेत उपचार न मिळाल्याने जावलीत सर्प दंशाने एकाचा म्रुत्यु,
जिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार, दोषींवर कारवाईची मागणी
कुडाळ – जावली तालुक्यातील भोगवली मुरा – माची येथील अर्जुन बाळकृष्ण सणस वय ४६ यांना सर्प दंश झाला होता .वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा म्रत्यू झाला असून जिल्हा शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभारामुळे या शेतकऱ्याला आपले प्राण गमवावे लागले. तर वैद्यकीय अधिकार्यांनी स्वतःच्या खाजगी रुग्णालयात या रुग्णाला पाठवल्याने त्याचा म्रत्यू नंतर नातेवाईकांना एकलाख रुपयांचे बील दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे युवानेते संदीप पवार यांनी सोशलमिडियातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
संदीप पवार यांनी दिलेली माहिती अशी चार दिवसांपूर्वीजावळी तालुक्यातील भाेगवली मुरा (माची) भौगोलिक दृष्ट्या डोंगर कपारीवर असणारी वस्ती. दळणवळण, सेवासुविधा आणि सामाजिक दृष्ट्या मागास असलेला भाग आहे. झाडाझुडपे आणि डोंगराळ भाग असल्याने तिथल्या ग्रामस्थांना अनेक समस्येना नेहमीच तोंड द्यावे लागते. चार दिवसांपूर्वी अर्जुन बाळकृष्ण सणस यांना विषारी सापाचा दंश झाला होता . या गावात दळणवळण आणि वाहनांचा अभाव आणि त्यातच कोरोना नावाच्या आजाराचे महाभयानक संकट असल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला. त्यांना अथक प्रयत्नातून सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालया पर्यंत नेहण्यात आले.
चार पाच तास झाले योग्य उपचार न झाल्याने नातलगांनी डॉक्टरांना विचारपूस केली. त्यावेळी तेथील एका डॉक्टरांनी इथे कोरोना पेशंट असल्याने योग्य उपचार होणार नाहीत असे सांगत जवळच्याच एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी जाण्यास सांगितले. पेशंटचा जीव वाचावा यासाठी नातलगांनी त्यांना सदरच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती केलं.
या हॉस्पिटलमध्ये भरती करूनही पेशंटची तब्येत स्थिर होत नव्हती. म्हणून नातलगांनी त्यांना कृष्णा हॉस्पिटल कराड मध्ये हलविण्याचा निर्णय घेतला. परंतु संबंधित हॉस्पिटल व्यवस्थापनाने त्यांना तिथुन सोडलं नाही. योग्य उपचार न मिळाल्याने अर्जुन सणस यांचा मृत्यू झाला. त्यांचा म्रतदेह नातलगांनी मागताच त्यांना चार पाच दिवसांचे लाखभर रुपयांचे बिल हातावर देण्यात आले. बिल भरत नाही तर मृत व्यक्तीला ताब्यात देणार नाही असं हॉस्पिटल प्रशासनाने सांगितलं. अधिक माहिती घेतली असता शासकीय रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डाँक्टरांचे ते हाँस्पिटल असल्याचे समजले.दोन वेळच्या भाकरीसाठी काबाडकष्ट करणारे लोक लाखभर बिल कसं भरणार हा प्रश्नच होता. तरीसुद्धा नातलगांनी जमवाजमव करून बिल भरण्याचा प्रयत्न केला तरीही २७ हजार रुपये कमी पडले. उरलेले बिल न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा हमीपत्रावर म्रतदेह नातलगांच्या हवाली करण्यात आला.
हा सर्व प्रकार अत्यंत गंभीर असून जिल्हाशल्य चिकित्सकांनी या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी संदीप पवार यांनी केली आहे.