जावलीत पाच जणांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह;

0
1

जावलीत पाच जणांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह;

एकूण १३६,बळी ९,मुक्त ७४,अँक्टिव्ह ५३

सूर्यकांत जोशी कुडाळ – रविवारी रात्री उशीरा आलेल्या अहवालात जावली तालुक्यातील  मुनावळे येथील पाच जणांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी भगवानराव मोहिते यांनी दिली आहे.

          एक जुलै रोजी मुंबई हुन दहाजण मुनावळे येथे आले होते. पैकी एकाला त्याच दिवशी त्रास जाणवू लागल्याने त्याचा स्वाब घेतला असता त्याचा कोरोना पाँसिटीव्ह आला होता.उर्वरीत नऊ सहप्रवाशांचे विलगीकरण केले होते. त्यांचे स्वाब तपासणी साठी पाठवले असता पाच जणांचा अहवाल कोरोना बाधित असल्याचा आला आहे.एकूण ३४ संशयितांचे स्वाब तपासणीसाठी पाठवले होते पैकी २९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जावली तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा १३६  वर पोहचला आहे. ९  जणांचा  बळी गेला आहे, ७०जण मुक्त झाले, तर ५३ रुग्ण  उपचारार्थ दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here