जावलीत पाच जणांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह;

जावलीत पाच जणांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह;
एकूण १३६,बळी ९,मुक्त ७४,अँक्टिव्ह ५३
सूर्यकांत जोशी कुडाळ – रविवारी रात्री उशीरा आलेल्या अहवालात जावली तालुक्यातील मुनावळे येथील पाच जणांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी भगवानराव मोहिते यांनी दिली आहे.
एक जुलै रोजी मुंबई हुन दहाजण मुनावळे येथे आले होते. पैकी एकाला त्याच दिवशी त्रास जाणवू लागल्याने त्याचा स्वाब घेतला असता त्याचा कोरोना पाँसिटीव्ह आला होता.उर्वरीत नऊ सहप्रवाशांचे विलगीकरण केले होते. त्यांचे स्वाब तपासणी साठी पाठवले असता पाच जणांचा अहवाल कोरोना बाधित असल्याचा आला आहे.एकूण ३४ संशयितांचे स्वाब तपासणीसाठी पाठवले होते पैकी २९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जावली तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा १३६ वर पोहचला आहे. ९ जणांचा बळी गेला आहे, ७०जण मुक्त झाले, तर ५३ रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत.
केडंबे गावचे कन्टेमेंट झोनचे निर्बंध शिथील
जावली तालुक्यातील केडंबे या गावात कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यामुळे या गावाला कन्टेमेंट झोन चे निर्णय लागू करण्यात आले होते. परंतु सदर गावात निर्धारित कालावधीत पुन्हा कोरोना बाधित रुग्ण आढळला नसल्याने जावली तालुक्याचे तहसीलदार तथा इंन्सिडेंट कमांडर शरद पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते व गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्या संयुक्त अहवाला नुसार केडंबे गावाचे कन्टेमेंट झोनचे निर्बंध शिथिल करण्यात येत असल्याचे आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंन्सिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केले आहेत.