Skip to content

जावलीत आज सतरा जणांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह

बातमी शेयर करा :-

जावलीत आज सतरा जणांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह 

रामवाडीचा कोरोनाचा विळखा सैलःदोन दिवसात तालुक्यातील २४ जण मुक्त

एकूण १५६ ,बळी ११ ,मुक्त ९८,अँक्टिव्ह ४७

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील चौतीस कोरोना संशयितांचे स्वाब तपासणी साठी पाठवले होते. आज गुरुवारी रात्री उशिरा त्याचा अहवाल प्राप्त झाला असून पैकी तब्बल सतरा जणांचे अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आले आहेत.एकूणच जावली तालुक्याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र आहे.

            आजच्या अहवालात पुनवडी ८ ,धोंडेवाडी १, कास ७ , कुसुंबी १  अशा एकूण १७ जणांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी भगवानराव मोहिते यांनी दिली आहे.

      जावली तालुक्यातील रामवाडी या गावावरील कोरोनाचा विळखा आता सैल होऊ लागला आहे.पंधरा दिवसांपूर्वी कोरोनाचा रुग्णाच्या  निकट संबंधित  या गावातील ३३ तर करहर येथील दोन जण बाधित झाले होते. पैकी एकोणीस जण दोन दिवसात कोरोनावर यशस्वी पणे मात करुन घरी परतले आहेत. पैकी मंगळवारी नऊ तर बुधवारी  ४८   व ३० वर्षीय महिला  २२ वर्षीय पुरुष व    ५ वर्षाचा बालक असे चार जण व गुरुवारी रामवाडी येथील 57,  42, 48, 43, 55 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष.कोरोना मुक्त झाले आहेत.याशिवाय आखेगणी येथील 65 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय युवक, 40 वर्षीय महिला, बीरमनेवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, बामणोली येथील 46 वर्षीय पुरुष, यांंनीही कोोरोना वर मात केली आहे.

यापुढे नियम न पाळणारांवर कडक कारवाई – तहसीलदार

           तालुक्यात विविध ठिकाणी प्रशासनाच्या वतीने covid-19 या संसर्गजन्य आजाराबाबत ग्रामस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली .कोरोना विषाणूचा संसर्ग काळामध्ये ग्राम दक्षता कमिटीने वेळोवेळी आपली महत्त्वाची भूमिका बजावली आहे खऱ्या अर्थानं ग्रामस्तरीय कमिटीच्या माध्यमातून गावागावांमध्ये चांगल्या प्रकारचे नियोजन  करण्यात आले होते.यामुळेच काही अंशी कोरोना थोपवण्यात यश आले . येणाऱ्या काळामध्ये तोंडाला मास्क नसणाऱ्यांना सोशल डिस्टंसिंग न पाळणारा वर कडक कारवाई करण्याच्या सुचना  तहसीलदार शरद पाटील यांनी या बैठकीत दिल्या .

              बैठकीला  पंचायत समिती गट विकास अधिकारी सतीश बुद्धे,विस्ताराधिकारी  मासाळ  उपस्थित होते. या कार्यशाळांना पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे, तसेच पदाधिकारी,सरपंच, ग्रामविकास अधिकारी,ग्रामसेवक, कृषी अधिकारी  वैद्यकीय अधिकारी, मंडलाधिकारी,तलाठी,आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील,ग्रा.प.कर्मचारी यांच्या कडुन अधिकार्यांनी माहिती घेऊन आवश्यक सूचना केल्या.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!