Skip to content

जावली कोरोना बाधितांचा आकडा २०२ वर

बातमी शेयर करा :-

 जावली कोरोना बाधितांचा आकडा २००  पार  ;

जावलीत आज आठ कोरोना बाधित

सूर्यकांत जोशी कुडाळ – दि. १४. जावली तालुक्यात आज आठ जणांचा कोरोना बाधित अहवाल आला आहे. या मध्ये सायगांव चे ५ तर तेटली येथील ३ जणांचा समावेश आहे.अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा २०२ वर पोहचला आहे.

जावलीत एकूण २०२,  बळी ११, मुक्त ११२, अँक्टिव्ह ७९

         वाईतील बारा  कोरोना बाधित पोलिसांमध्ये  जावलीतील सायगांव व खर्शी येथील अशा दोन पोलिसांचा समावेश आहे. परंतु ते आठ दिवसांत घरी न आल्याने त्यांचे कुटुंबीय लोरिस्क मध्ये आहेत.तर सोनगांव येथील पुनवडी संपर्कातील दोन कोरोना बाधित सध्या सातारमध्ये रहात आहेत. परंतु त्यांचे नातेवाईक सोनगांव मध्ये असल्याने त्यांचे स्वाब तपासणी साठी पाठवले होते. परंतु सुदैवाने त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले.ही परिस्थिती पहाता कोरोनाचे संकट कोणत्या रुपाने आपल्या गावात किंवा आपल्या पर्यंत पोहचेल याचा नेम नाही. त्यामुळे सुरक्षित अंतर ठेवून सावध राहणे आवश्यक आहे.

कुडाळ बाजारपेठेत अधिक दक्षता आवश्यक

      कोरोनाचा विळखा कुडाळच्या चोहुबाजुने पडला आहे.ग्रामस्थांच्या दक्षतेमुळे गावात अद्याप कोरोनाचा शिरकाव झालेला नाही.कुडाळच्या वेशीवर असणाऱ्या सरताळे, बामणोली तर्फ कुडाळ तसेच उडतारे,सायगांव, मोरघर, खर्शी,बेलावडे  या गावात कोरोनाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे कुडाळ बाजारपेठेत अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे.

जावलीतील मेढा येथील प्रभाग  ८ व ९ ला मायक्रो कन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू ; – मिनाज मुल्ला

            जावली तालुक्यातील मेढा येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती  व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार या  गावातील प्रभाग क्र ८ व  ९ ला मायक्रो कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत  असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे. 

बामणोली तर्फ कुडाळ व आखेगणी चे कन्टेमेंट झोनचे  निर्बंध शिथिल

           जावली तालुक्यातील आखेगणी व बामणोली तर्फ कुडाळ या गावांत कोरोना पाँसिटीव्ह रुग्ण आढळल्याने कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात आले होते. परंतू निर्धारित कालावधीत या गावांत अन्य कोरोना बाधित रुग्ण न आढळल्याने  जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती  व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार या  गावातील कन्टेमेंट झोन चे निर्बंध शिथील करण्यात येत  असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे. 

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!