जावलीत आज ३७ कोरोना पाँझिटीव्ह रुग्णांची वाढ

जावलीत आज ३७ कोरोना पाँझिटीव्ह रुग्णांची वाढ
एकूण ३२२ ,बळी १२ ,अँक्टिव्ह १५८ डिस्चार्ज १५२ आज दि. १७ व १८ च्या अहवालातील ३७ पाँझिटीव्ह.
पुनवडी ३१ आलेवाडी ४ सायगांव २
सूर्यकांत जोशी कुडाळ –जावली तालुक्यात एकूण कोरोना बाधितां आकडा ३२२ वर पोहचला आहे. तालुक्यातील बारा जणांचा कोरोनाने बळी घेतला असून १५२ जण बरे होऊन घरी परतले आहेत. १५८ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत . पैकी एकट्या पुनवडी गावात कोरोना बाधितांचा आकडा १४९ वर पोहचला असून या गावातील दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
प्रशासनाचे नियम न पाळण्याने व बेजबाबदार पणा केल्यास केवढी मोठी किंमत चुकवावी लागते. याचे पुनवडी व रामवाडी हे मूर्तीमंत उदाहरण आहे. सध्याचे कोरोनाचे संकट हे जीवन व मरणातील दरी होऊन आले आहे. लग्नातील हौसेमौजे पेक्षा आणि दुख : द प्रसंगातील भावनिक गुंत्या पेक्षा सुरक्षित जगणे महत्वाचे ठरत आहे. आपल्यामुळे आपल्या स्वतः ला, कुटुंबाला व समाजाला अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेणेच शहाण पणाचे ठरणार आहे.
तालुक्यात आज पर्यंत कोरोना बाधितांची संख्या ३२२ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने पुनवडी १४९ आणि रामवाडी व त्यातील अन्य बाधित ३५ हा आकडा १८४ वर जातो.हे १८४ आहेत ते संबंधितांनी योग्य खबरदारी न घेतल्याने वाढलेले आहेत. त्यापूर्वी ३१ मे पर्यंत तालुक्यात ४५ कोरोना बाधित होते. जून महिन्यात ६९ कोरोना बाधितांची वाढ होऊन तीस जून अखेर हा आकडा ११४ वर पोहचला होता.तर तालुक्यात अँक्टिव्ह रूग्ण केवळ सहा होते. तालुका दुसर्यांदा कोरोना मुक्त होणार अशी शक्यता वर्तवली जात असतानाच रामवाडीची साखळी तयार झाली. सुदैवाने हे थोडक्यात आटोक्यात आले.तर त्याच दरम्यान लगेच पुनवडीचे लग्न मोठे संकट पुढे घेऊन आले.वास्तविक जरी या गावापुरते हे संकट दिसत असले तरीही यातून सोनगांव थोडक्यात निसटले.जरी पुनवडीत मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित असले तरीही त्याची झळ संपूर्ण तालुक्याला बसत आहे. आणि सर्व घडतय ते नियम न पाळल्यामुळे.नियम न पाळणारांना कारवाईची भिती नाही. आता पुनवडीत केवळ संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु यापुढे नियम न पाळणारांवर तसेच यातून काही संसर्ग वाढल्यास आर्थिक दंड तातडीने वसूल केला गेला पाहिजे. लोकांनी नियम पाळल्या शिवाय कोरोनाला थोपवता येणार नाही. लोकांनी बिनधास्त नियम तोडायचे आणि यातून कोरोना साखळी तयार झाली की प्रशासनाने ही साखळी तोडायसाठी पळायचे हे कुठतरी थांबले पाहिजे.अशा प्रतिक्रिया आता जनतेतून उमटत आहेत.
गेल्या चार महिन्यात अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांची वाट लागली आहे. केवळ व्यवसायांवर उपजिविका असणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोणीतरी नियमबाह्य वागायचे आणि त्याची झळ निरपराध लोकांनी सोसायची हे चक्र थांबवायलाच पाहिजे. अशी अपेक्षा आता जनतेतून व्यक्त होत आहे.
जावलीतील आलेवाडी गावाला झोनचे निर्बंध लागू ; – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील आलेवाडी येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार या गावाला कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.