Skip to content

जावलीत आज तीन जण कोरोना बाधित तर चार जणांना डिस्चार्ज

बातमी शेयर करा :-

जावलीत आज तीन जण कोरोना बाधित तर चार जणांना डिस्चार्ज       

        एकूण ३६४,बळी  १२

 सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज सायगांव येथील ल दोन तर रायगांव येथील ल एक अशा तीघांचे अहवाल कोरोना बाधित आला आहे. तर आज चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.

            दरम्यान तालुक्याचा कोरोनाचा विळखा आता सैल होऊ लागला असून जनतेने नियमांचे पालन करुन संयम बाळगणे आवश्यक आहे .प्रत्येक जावलीकराने सवयभान होऊन मीच माझा रक्षक ही भूमिका घ्यावी असे आवाहन तहसीलदार शरद पाटील यांनी केले आहेे.

              जावली तालुक्यातील १२५  गा्वांपैकी ४६ गावात कोरोनाने हजेरी लावली आहे.तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा ३६४ वर पोहचला आहे. आज पर्यंत कोरोनाने बारा जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय कोरोना बाधित व बळींची आकडेवारी पुढील प्रमाणे.

     केळघर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावांपैकी दहा  गावात कोरोना बाधितांचा आकडा १९० वर पोहचला  असून चार जणांचा बळी घेतला आहे. यात पुनवडी -१६१,  बळी (२), आंबेघर तर्फ मेढा  ३ ,ओझरे ४ बळी (१), केडंबे -१,केळघर-६ ,गवडी-३  ,भणंग -४ ,मेढा-४  ,भुतेघर -१ , वरोशी- ३ बळी (१),

     कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावांपैकी ११ गावात कोरोना बाधितांचा आकडा ७० झाला असून चार जणांचा बळी गेला आहे.यात आखेगणी -४, दापवडी-१३ , करहर-३  ,काटवली -३, कावडी  – ४ ,बामणोली  तर्फ कुडाळ-१, ,बिरामणेवाडी-३ ,रांजणी -३ बळी(१) , रामवाडी -३२ बळी(१)  ,वहागाव-२  बळी (१) , शिंदेवाडी -२ बळी (१)

  कुसुंबी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत पाच गावात सोळा जण कोरोना बाधित झाले असून दोन जणांचा बळी गेला आहे. यामध्ये आखाडेवस्ती कुसुंबी -३(१) ,गांजे-३(१) , निझरे – ४ ,म्हाते खुर्द-४,म्हाते मुरा -२ ,

 सायगांव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांपैकी दहा गावात ५६ जण कोरोना बाधित झाले असून एक जणाचा बळी गेला आहे. यामध्ये धोंडेवाडी -५  , प्रभूचीवाडी-४  ,बेलावडे ५ बळी (१)  , मार्ली-१   , मोरघर -५ , सायगांव-२२ ,आलेवाडी -४   , रायगांव-६ , दुदुस्करवाडी-२ ,सरताळे -२. 

 बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावांपैकी ९ गावातील ३२ जण कोरोना बाधित झाले असून एक जणाचा बळी गेला आहे. यामध्ये आपटी -१   , कळकोशी-२  ,कास-८ ,केळघर तर्फ सोळशी -२(१) ,तोरणेवाडी-३  , मुनावळे  -६, तेटली -३  ,पावशेवाडी-१   ,सावरी ६ .एकूण कोरोना बाधित ३६४, बळी -१२, कोरोना मुक्त २६४, अँक्टिव्ह -८८ .

 जावलीतील रायगांव बगाडे आळीला कन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू ; – मिनाज मुल्ला

            जावली तालुक्यातील रायगांव येथील बगाडे आळी (बौद्ध वस्ती ) येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती  व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार या  गावातीलबगाडे आळी (बौद्ध वस्ती )कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत  असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे. 

धोंडेवाडी चे कन्टेमेंट झोन निर्बंध शिथिल

           जावली तालुक्यातील धोंडेवाडी या गावांत कोरोना पाँसिटीव्ह रुग्ण आढळल्याने कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात आले होते. परंतू निर्धारित कालावधीत या गावांत अन्य कोरोना बाधित रुग्ण न आढळल्याने  जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती  व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार या  गावातील कन्टेमेंट झोन चे निर्बंध शिथील करण्यात येत  असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे. 

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!