कोविड केअर सेंटरवर सेवा बजावण्यासाठी गेलेले डॉक्टरच कोरोना बाधित

कोविड केअर सेंटरवर सेवा बजावण्यासाठी गेलेले डॉक्टरच कोरोना बाधित
कुडाळच्या ४२ जणांच्या स्वाबचे अहवाल उद्या येणार; आज १ बाधित
महसूल विभाग कोरोना पासून सुरक्षित
एकूण ४५४ , बळी १५ , डिस्चार्ज ३६९ , अँक्टिव्ह ७०
कुडाळ एकूण – १०
जावलीत आज ६ डिस्चार्ज
सूर्यकांत जोशी कुडाळ – रायगांव येथील कोविड केअर सेंटरवर सेवा बजावण्यासाठी गेलेल्या डाँक्टरांची चाचणी कोरोना पाँझिटीव्ह आली आहे. कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती असल्याने शासनाने खाजगी दवाखाने असलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांना कोविड सेंटरवर सेवा बजावणे बंधनकारक केले आहे. त्याप्रमाणे हे डॉक्टर ही आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची कोरोना अँटिजेन चाचणी केली असता त्यांचा अहवाल कोरोना बाधित आला.त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना होम आयसोलेशन चा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान आज कुडाळ येथील एका तीस वर्षीय महिलेचा अहवाल बाधित आला आहे.ही महिला यापूर्वी बाधित आलेल्या बारावर्षीय मुलीची आई आहे. याशिवाय कोरोना बाधितांच्या सहवासातील ४२ जणांचे स्वाब घेऊन तपासणीसाठी लँबला पाठवण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल उद्या रात्री पर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.तसेच जावली तालुक्यातील आज सहा जण कोरोनावर मात करून घरी परतलेअसल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांनी सांगितले.
जावलीतील महसूल विभाग सुरक्षित
आज जावली तालुक्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी अशा अठ्ठावीस जणांची कोरोना अँटिजेन चाचणी घेण्यात आली. परंतु सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने जावलीचा महसूल विभाग कोरोना पासून सुरक्षित आहे.अशी माहिती तहसीलदार शरदपाटील यांनी दिली आहे.
कुडाळ येथे कोरोना रुग्ण आढलेल्या भागात तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शरदपाटील ,गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार येथील बँक ऑफ महाराष्ट्र ते गोडाऊन पर्यंत च्या भागाला कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लागू करण्यात आल्याचा आदेश उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.