Skip to content

जावली तालुक्यात आज ७ जणांचा अहवाल कोरोना बाधित

बातमी शेयर करा :-

  एकूण ४६१ , बळी १५ ,  डिस्चार्ज ३७० , अँक्टिव्ह ७६

       कुडाळ एकूण – १७

 जावलीत आज  १ डिस्चार्ज

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात कोरोनाची घोडदौड सुरुच आहे. कोरोनाचा हा वारु आता कुडाळ मध्ये सुटला आहे. गुरुवारी कुडाळ येथील ४२ जणांच्या घेतलेल्या स्वाब पैकी सात जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.यामध्ये पुरुष – ३९,३० व ३३ वर्षे आणि ३ वर्षे वयाचा मुलगा,महिला – २६  वर्षे, व  ५ व ३ वर्षाच्या मुलीचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.   आज  २४ जणांचे स्वाब घेण्यात आले आहेत अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी दिली.

            कुडाळ येथील कोरोना बाधितांचा आकडा पाच दिवसात तब्बल १७ वर पोहचला आहे .   

  घाबरु नका, काळजी घ्या.घरातच थांबा, सुरक्षित रहा, आजाराची कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधा असे आवाहन गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी केले आहे  .

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!