Skip to content

कुडाळ येथे बहुउद्देशीय इमारतीच्या कामाचा शुभारंभ

बातमी शेयर करा :-
कुडाळ येथील बहुउद्देशीय इमारतीच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ

 सूर्यकांत जोशी कुडाळ कुडाळ मध्ये ग्रामपंचायत , ग्रामस्थ व पुरोगामी युवक मंडळाच्या पुढाकाराने श्री. पिंपळेश्वर बहुउद्देशीय केंद्र इमारतीच्या कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.

      कुडाळ गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी  ग्रा .प .पाणीपुरवठा टाकीजवळ पवार आळी मध्ये नियोजित आराखड्यात मंजूर असलेल्या प्रमाणे बहुउद्देशीय केंद्राची इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले . 

    यामध्ये मुलांच्या करिता अभ्यासिका, छोट्या इनडोअर गेम्स , महिला वर्गाकरिता योगसाधना व प्रबोधनात्मक शिबिरे तसेच ज्येष्ठांसाठी आसन व्यवस्था , छोटे सांस्कृतिक कार्यक्रम , पेपर वाचनालय असे अनेकविध पैलू असणार असणार आहेत .

     या इमारती करता *8 लाख 89 हजार रुपये* निधी वापरून सुमारे *20 फूट बाय 30 फूट* अशी आरसीसी डिझाईन मधील उत्कृष्ट दर्जाची इमारत बांधण्यात येणार आहे .

    त्या इमारतीच्या श्रीफळ वाढवण्याकरता तसेच भूमिपूजनाचा शुभारंभ करण्याकरता 

श्री.विरेंद्रजी शिंदे ( सरपंच) , श्री .गणपत नाना कुंभार ( उपसरपंच) श्री. दत्ता रासकर सर (व्हा. चेअरमन सोसा .)श्री. महादेव राव शेवते ( मा. सरपंच )श्री. मालोजीराव शिंदे,श्री. अमृतराव शिंदे , श्री.उत्तम आप्पा पवार , श्री.राहुल ननावरे ग्रा प.सदस्य, श्री. अमोल शिंदे( संचालक – सोसायटी  ),श्री. महेश पवार ,पुरोगामीचे श्री .बापू बोडरे , रामदास कुंभार,  मोहन घोडके,  सुनील रासकर ,दत्ताअप्पा शिंदे , मनोज वंजारी ,सोमनाथ कदम  , धनंजय केंजळे , काशिनाथ शेवते , सोमनाथ सासवडे , संभाजी पवार , विजय शेवते , इंद्रजित शिंदे ,संतोष पवार , नंदकुमार किर्वे ,या सहित शिंदे आळी पवार आळी व  परिसरातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते . 

     वरील देखणी आणि छान  इमारत सर्वांचे पुढाकाराने , सर्वांचे सहकार्य लवकर पूर्ण करण्याची ग्वाही उपस्थित यांनी दिली.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!