जावलीत आज दोन कोरोना बाधित रुग्णांची भर ; ८ जनांची कोरोनावर मात

जावलीत आज दोन कोरोना बाधित रुग्णांची भर ; ८ जनांची कोरोनावर मात
दुदुस्करवाडी कोरोना मुक्त
एकूण ४६६ , बळी १५ , डिस्चार्ज ४१४ , अँक्टिव्ह ३७
मेढा येथील 33 जणांच्या अहवालाची प्रतिक्षा
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील आज रायगांव येथील एक तर दुदुस्करवाडी येथील सात जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.दरम्यान मेढा येथे आढळलेल्या कोरोना बाधितांच्या हायरिस्क क्वान्टँक मधील ३३ जणांच्या स्वाबचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
सायगांव विभागातील कोरोनाचा हाँटस्पाँट बनलेली दुदुस्करवाडी आज कोरोना मुक्त झाल्याने या विभागातील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
रविवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात रानगेघर येथील ६२ वर्षीय पुरुष व ५५ वर्षीय महिला अशा दोघांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांनी दिली.
दुदुस्करवाडी नंतर कुडाळ येथे आठ दिवसात तब्बल अठरा कोरोना बाधित रुग्ण आढळले. परंतु हे चक्र वेळीच थांबण्यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न होत आहेत. या प्रयत्नांना ग्रामस्थ सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.त्यामुळे हा फैलाव रोखण्यात यश येत आहे.
जावलीतील रानगेघर गावाला कन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू ; – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील रानगेघर येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार रानगेघर या गावाला कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.