सूर्यकांत जोशी कुडाळ – (EVM) व VVPAT पद्धतीत मतदान मोजणी गावनिहाय / प्रभागनिहाय केली जाते. त्यामुळे एखाद्या गावात किंवा प्रभागात किती मतं कोणत्या उमेदवाराला मिळाली हे स्पष्ट दिसून येते. यामुळे मतदारांवर दबाव येतो. एखाद्या पक्षाचे अथवा उमेदवाराचे विचार पटत नसतानाही केवळ भविष्यात गावच्या विकासावर परिणाम नको म्हणून मतदान करणे भाग पडते यामध्ये संबंधित पक्षाच्या व उमेदवाराच्या गावातील प्रमुख कार्यकर्त्यांवर दबाव असतो गावात होणाऱ्या मतदानावरच कार्यकर्त्याची पथ अवलंबून असते त्यामुळे गावातील प्रमुख कार्यकर्ते आपल्या गावातून संबंधित पक्ष जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदारावर दबाव टाकत असतात. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष व नेत्यांच्या असा दबाव व प्रभाव दिसून येतो.
गेल्या अनेक वर्षात आत्तापर्यंत विविध राजकीय पक्षांनी EVM मशीन सदोष असल्याची टीका केली. भलेही ही मशीन सदोष नसेलही परंतु या मशीनद्वारे होणारी मतमोजणी पद्धती मात्र निश्चितच सदोष आहे अशीही चर्चा होते. गाव प्रभाग निहाय मतदान समजत असल्याने मतदारांची गुप्तता कमी होते. भलेही व्यक्तीचे मत कळत नाही, पण गावाचा कल लगेच स्पष्ट होतो.त्यामुळे गावात विभागणी वाढते. मतांवरून गावांमध्ये मतभेद, आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात.याचा लोकशाही प्रक्रियेवर परिणाम होतो मतदार निश्चिंतपणे मतदान करण्याऐवजी दबावाखाली वागू लागतात.
म्हणून अनेक वेळा निवडणूक आयोगाकडे मागणी होते की, मतमोजणी संपूर्ण मतदारसंघ किंवा मोठ्या टप्प्यांनुसार करावी, जेणेकरून गावनिहाय निकाल दिसणार नाहीत. व मतदारांना मतदान निर्भयपणे करता येईल.
EVM मशीन मतदान मोजणी पद्धतीत गाव – प्रभागनिहाय मतदान समजत असल्याने मतदारांवर दबाव. मतमोजणी प्रक्रियेत बदल करण्याची आवश्यकता
- Advertisment -