हवालदार लक्ष्मण कदम यांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा उत्साहात संपन्न
सूर्यकांत जोशी कुडाळ –
कार्यकर्ता हा समाजासाठी असणार्या तळमळीतून तयार होतो.कामकरणार्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी समाज उभा राहतो.सोमनाथ कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभे असणारे लोकमत हेच त्यांच्या आई वडिलांच्या पुण्याईचे फलीत आहे.सोमनाथ कदम यांच्या सारख्या तरुण तडफदार व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभे राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
पोलीस दलातील कर्तव्य दक्ष हवालदार लक्ष्मण कदम यांच्या सहस चंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी आमदार सदाशिव सपकाळ,माजी शिक्षण सभापती अमित कदम, जावली बॅंकेचे माजी चेअरमन योगेश गोळे, बुवासो.पिसाळ,माजी सरपंच जितेंद्र शिंदे,वीरेंद्र शिंदे,गणपत कुंभार, संजय शिंदे, उपस्थित होते.
सदाशिव सपकाळ म्हणाले, जावली तालुका ही क्रांती कारणांची भूमी आहे.स्वत:चे बलिदान देऊन २६/११ घ्या हल्ल्यातील जिवंत अतिरेकी पकडण्याचे धाडस सुद्धा जावली तालुक्यातील तुकाराम ओंबळे यांनी केले.या परंपरेचा आदर्श लक्ष्मण कदम यांच्या सारख्या निष्ठावंत व कर्तव्यदक्ष अधिकार्यांनी घालून दिला आहे.
यावेळी अमित कदम, ज्येष्ठ नागरिक विलास कांबळे, भिकू राक्षे, तसेच अविनाश गोंधळी शितल घुले यांनी मनोगत व्यक्त केले.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जेष्ठ नागरीकांना भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक घुले सर यांनी केले.महेश पवार यांनी सुत्र संचालन केले.उपसरपंच सोमनाथ कदम यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
