Saturday, April 11, 2026
HomeTop Newsदोन महिने बंद राहिलेल्या दुकानांत बुरशीमुळे फर्निचर व मालाचे नुकसान. व्यापारी दुहेरी...

दोन महिने बंद राहिलेल्या दुकानांत बुरशीमुळे फर्निचर व मालाचे नुकसान. व्यापारी दुहेरी संकटात

सूर्यकांत जोशी कुडाळ दि.३०- कोरोना साखळी तोडण्यासाठी शासनाने दोन महिन्यांपासून लॉकडाऊन चे आदेश जारी केले.शासनाच्या अत्यावश्यक सेवेच्या यादीत नसलेली दुकाने तेव्हापासून बंद आहेत.गेल्या महिनाभरातील दमट हवामान आणि दुकाने हवाबंद राहिल्याने अनेक दुकानांतील फर्निचरसह मालाला काळ्यापांढर्या बुरशीचे थर चढले आहेत. कोळीष्टकांच्या जाळ्या आणि दुर्गंधी येत असल्याचे दिसून येत आहे. अनेक वस्तूंची मुदत संपल्याने त्या कालबाह्य झाल्या आहेत.एकीकडे दुकानं बंद राहिल्याने व्यापारी तोटा तर दुसरीकडे फर्निचर व मालाचे नुकसान यामुळे व्यापारी वर्ग दुहेरी संकटात सापडला आहे.

          कोरोना बाधित रुग्णांना म्युकरमायकोसिस या काळ्यापांढर्या बुरशीचे आजार होत असल्याचे प्रसारमाध्यमांतून पहायला मिळत आहे.परंतू अनेक दुकानांत सुद्धा अशा काळ्यापांढर्या बुरशीचे थर साठले आहेत.हे संबंधित दुकानदार, कर्मचारी आणि अशा वस्तूंवरील जंतू द्वारे संसर्ग होऊन आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.

            शासनाने संसर्ग साखळी रोखण्यासाठी लॉकडाऊन केले.’लहरी राजा प्रजा आंधळी, अधांतरी दरबार ‘.  या गाण्याप्रमाणे काहीशी अवस्था झाली आहे.शासनाने आदेश दिले आणि दुकानदारांनी निमुटपणे दुकानं बंद ठेवली.पण गेल्या दोन महिन्यांतील कर्जाचे व्याज,दुकानं गाळा भाडे, वीज बील,मालाचे व फर्निचर यांचे नुकसान, दुकानांतील कामगारांचे पगार व त्यांच्या रोजी रोटी ची व्यवस्था.दुकानदारांचा कौटुंबिक खर्च याबाबत कोणतीही व्यवस्था केली नाही.यासाठी असे निर्णय घेणारे सर्वसामान्य कुटुंबातील असावेत. तरच त्यांना सर्वसामान्य समाजाच्या अडचणी समजणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page