कुडाळ – पाचवड ते खेड दरम्यान नव्याने होत असणाऱ्या महामार्गावर प्रतापगड सहकारी साखर कारखाना ते करंदोशी गावा दरम्यान रस्त्यात उभ्या असणाऱ्या ठेकेदाराच्या डंपरला छोट्या हत्तीने पाठीमागून जोरदार धडक देऊ भीषण अपघात झाला या अपघातात छोटे हत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमेला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अशी माहिती घटनास्थळावरून प्रत्यक्ष दर्शन च्या कडून मिळत आहे.
दरम्यान या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याने वाहने प्रचंड वेगात मध्ये असतात त्यातच हा डंपर दररोज रस्त्याच्या मधोमध उभा केलेला असतो त्याला सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही रिप्लेक्टर नाहीत तसेच कोणतेही बॅरिकेटिंग केले जात नाही. त्यामुळे हा अपघात घडला असा आरो प स्थानिक नागरिकांनी केलेला आहे याबाबत सखोल चौकशी होऊन संबंधित डंपर मार्गावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.



