Monday, April 6, 2026
HomeTop Newsभाजपाच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा :"तुम्ही साथ द्या,मी तुम्हाला हवा...

भाजपाच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा :”तुम्ही साथ द्या,मी तुम्हाला हवा असणारी विकास कामे देतो” ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले
*वसंतराव मानकुमरे हे लढवय्या नेतृत्व विक्रमी मतांनी विजयी करा *


सूर्यकांत जोशी कुडाळ – केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असून या शासनाच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात आपण संपूर्ण मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचे विकासकामे आणले आहेत तर आजही अनेक कामे सुरू आहेत येणाऱ्या काळात शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्ता भारतीय जनता पक्षाच्या हातात असणे आवश्यक आहे त्यासाठी या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचे मतभेद बाजूला ठेवून भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा. तुम्ही मते द्या मी तुम्हाला हवे असणारे विकास कामे देतो  असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.


        करंदी तर्फे कुडाळ तालुका जावली येथे म्हसवे जिल्हा परिषद गटातील भाजपाचे अधिकृत उमेदवार वसंतराव मानकुमरे व म्हसवे गणाच्या उमेदवार रेश्मा पोफळे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ म्हसवे गटाचे उमेदवार वसंतराव मानकुमरे, म्हसवे गणाच्या उमेदवार रेश्मा पोफळे माजी सभापती रविंद्र परामणे,तानाजीराव शिर्के , दत्ता गावडे, सयाजीराव शिंदे, संदीप परामणे व मान्यवर उपस्थित होते.
           म्हसवे जिल्हा परिषद गटाचे गेले तीस वर्षे नेतृत्व करणारे वसंतराव मानकुंबे हे लढवय्या नेते आहेत त्यांनी गेल्या 30-35 वर्षाच्या आपल्या राजकीय कारकीर्दीत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक आंदोलने केली मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून त्यांनी गावागावात विकास कामे केली आहेत त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात त्यांचा नेहमीच सहभाग राहिला आहे तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीशी त्यांच्या असणारे संबंध चांगल्या जिव्हाळ्याचे आहेत विरोधकांनी कितीही भूलथापा दिल्या तरीसुद्धा मानकुमरे भाऊंचे योगदान जनता विसरणार नाही आणि त्यांना या निवडणुकीत सुद्धा विक्रमी मताने विजयी करेल असा विश्वास नामदार शिवेंद्रराजेने व्यक्त केला.
   विरोधी उमेदवाराचे धंदे सर्वज्ञात : त्याचे डिपॉझिट जप्त करून पाडा – मानकुमरे
     गेले 35 वर्ष जावली तालुक्यात आपण विविध विकासकामे राबवत आहोत. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न या कालावधीत केला आहे त्यामुळे आपल्याला निवडणुकीची अजिबात सुद्धा चिंता नाही विरोधी उमेदवाराचे कर्तत्व काय त्याचे उद्योग सर्वज्ञात आहेत आत्तापर्यंत ब्लॅकमेलिंग शिवाय यांनी केले काय विरोधी पक्षाने आपल्या विरोधात उमेदवार देताना तरी किमान त्याची पात्रता बघून घ्यायला पाहिजे होतं. या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करून त्याला गाडा  अशी घनाघाती टीका वसंतराव मानकुमरे यांनी केली.
       भाजपाचे तालुका प्रवक्ते सुरेश गायकवाड यांनी सूत्रसंचालन करत भारतीय जनता पक्षाचे ध्येयधोरणे नामदार शिवेंद्रराजे यांच्या माध्यमातून होणारे विकास कामे वसंतराव मानकुमरे भाऊ यांच्या कार्याची माहिती  दिली.

         यावेळी करंदी ग्रामस्थांच्या वतीने प्रतापगड कारखान्याचे संचालक बाळासाहेब निकम यांनी करंदी ग्रामस्थ एकजुटीने भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभे राहतील अशी ग्वाही दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page