Monday, April 6, 2026
HomeTop Newsसातारा जिल्ह्यात भांगलणासाठी शेतमजूर मिळत नसल्याने 'कोळपणी' वर भर ‌‌‌‌;

सातारा जिल्ह्यात भांगलणासाठी शेतमजूर मिळत नसल्याने ‘कोळपणी’ वर भर ‌‌‌‌;

         अजित जगताप,     सातारा दि : उत्तम शेती, मध्यम व्यापार ,कनिष्ठ नोकरी हा काळ मागे गेला असून आता आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्याने उत्तम कोळपणीशिवाय शेतकऱ्यांना पर्याय राहिला नाही. भांगलणासाठी महिला मिळत नाही. अशी ग्रामीण भागात स्थिती निर्माण झाली आहे.                 शेतकरी वर्ग सुखी होते. त्यावेळी शेतमजुरांना काम मिळत होते. आता शेतकरी नैसर्गिकरित्या अडचणीत आल्यानंतर त्यांना शेतमजूर मिळत नाही, अशी अवस्था झाली आहे. ज्वारी, हरभरा भांगलणासाठी ग्रामीण भागात महिला मिळत नाही. पूर्वी दोनशे रुपये हजेरीवर महिला शेत मजूर म्हणून शेत शिवारात कामावर येत होत्या, आता, आजूबाजूला लघुउद्योग व इतर कामे मिळत असल्याने महिलांना शेतातील कामे नकोशी वाटू लागली आहेत. मोकळ्या रानातील                        गवत काढणे,साफ सफाई करणे, बांधकामासाठी कामगार म्हणून काम करणे, लग्नसमारंभात वाढपी,स्वयंपाकी या कामांसाठी ज्यादा मोबदला व खाद्य पदार्थ मिळतात, त्याकडे अनेक गरीब महिला व युवती कामाला जातात.त्यामुळे ग्रामीण भागात महिला मजूर शेतीच्या कामांसाठी मिळत नाही. पर्याय म्हणून कोळपणी करावी लागते. पुरुषांना चारशे रुपये रोज देऊन शेती कामांसाठी घेऊन जावे लागते.                          अचानक  उदभवलेल्या मदतीच्या वेळी आपल्या शेतीच्या कामांवर न येणाऱ्या महिला शेत मजुरांना काही शेतकरी मदत करीत नाहीत. हे सुध्दा ग्रामीण भागात घडू लागले आहे. त्यामुळे शेतकरी व शेत मजूर या दोघांच्याही गरजेवेळी मदतीला धावून आले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या कोळपणीने भांगळण होत असून अवकाळी पाऊस थांबला असल्याने शिवारात शेतीच्या कामांना गती प्राप्त झाली असल्याचे चित्र दिसत असल्याचे  सायगाव ता जावळी येथील शेतकरी अमोल जगताप, मारुती सोनवणे यांनी सांगितले.शेतमजूर अभावी अनेकांनी उसाची लागण केल्याने शिवारात उसाचे प्रमाण वाढले आहे तसेच खाजगी साखर कारखाने उभे राहिले आहेत. त्यामुळे ऊस तोडणी व वाहतूक व्यवस्था पहाण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे.           ………………… फोटो-शेतात कोळपणी चे स्वतः काम करताना शेतकरी (छाया-निनाद जगताप, सातारा)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page