Sunday, April 5, 2026
Homeसामाजिकसाताऱ्यातील छत्रपती घराण्याचा शाही दसरा यंदा साधेपणाने; सीमोल्लंघनाचा निधी पूरग्रस्तांसाठी

साताऱ्यातील छत्रपती घराण्याचा शाही दसरा यंदा साधेपणाने; सीमोल्लंघनाचा निधी पूरग्रस्तांसाठी

महाराष्ट्रात यावर्षी पूर परिस्थिती गंभीर झाली आहे.  छत्रपती घराण्याने पारंपरिक शाही विजयादशमी आणि सीमोल्लंघन सोहळा यंदा साधेपणाने साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोशल मीडियावर हा निर्णय जाहीर करत राज्यातील नागरिकांना पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले आहे.

पूरस्थितीमुळे शाही दसरा साधेपणाने

पावसामुळे मराठवाडा, कोकण, सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग अत्यंत पूरग्रस्त झाला आहे. हजारो शेतकऱ्यांचे नुकसान, घरदारे वाहून गेली आहेत, व जनजीवन विस्कळीत झाले आहे. या संकटाच्या काळात शाही दसरा डामडौल न करता साधेपणाने साजरा होणार आहे, असा निर्णय छत्रपती घराण्याने घेतला आहे.

शासकीय निधी पूरग्रस्तांसाठी

सोहळ्यासाठी मिळणारा शासकीय निधी या वर्षी थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे पूरबाधितांच्या मदतीसाठी वर्ग केला जाणार आहे. नागरिकांनी आर्थिक, वस्तूरूप किंवा धान्य स्वरूपात मदत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पूरग्रस्तांना द्यावी, असे उदयनराजे भोसले यांनी आवाहन केले आहे.

नागरिकांनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा

खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले, “महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी प्रत्येकाने शक्य तितकी मदत करावी. एक भारतीय म्हणून आपली सामाजिक जबाबदारी निभवावी.” मराठवाडातील पूरग्रस्तांचा त्रास लवकर कमी व्हावा यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे अत्यावश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page