Monday, April 6, 2026
HomeTop Newsस्वच्छ व सुंदर शहर अशी कुडाळ गावची ओळख होणार - सौरभ शिंदे

स्वच्छ व सुंदर शहर अशी कुडाळ गावची ओळख होणार – सौरभ शिंदे

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील कुडाळ हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे आहे.या गावाची ओळख भविष्यात स्वच्छ व सुंदर शहर अशी व्हावी यासाठी नियोजन बद्ध कामे केली जातील असे प्रतिपादन जावली पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांनी केले.कुडाळ येथे वीस लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

            जिल्हा परिषद-पंचायत समिती, आ.श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले  व जावली पंचायत समिती उपसभापती सौरभ बाबा शिंदे  यांच्या माध्यमातुन व कुडाळ ग्रामपंचायत च्या पाठपुराव्याने मोठ्या नागरी सुविधा अंतर्गत कुडाळ येथील

पिंपळेश्वर कॅालनी येथील रस्ता कांक्रिटीकरण ५ लक्ष रूपये,

समर्थ कॅालनी येथील रस्ता व गटर करणे ५ लक्ष रूपये, सावतामाळी मंदीर ते पानस रस्ता बंदीस्त गटर ५ लक्ष रूपये, विकास सोसायटी ते डेअरी येथील बंदीस्त गटर ५ लक्ष रुपये अशी एकुण कुडाळ येथे २० लाख रुपये च्या कामे होणार आहेत..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page