Monday, August 17, 2026
HomeTop Newsकुडाळ येथून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण: मुलींनी समय सूचकता दाखवत स्वतःला सोडवले.:...

कुडाळ येथून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण: मुलींनी समय सूचकता दाखवत स्वतःला सोडवले.: जावलीत मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर


सूर्यकांत जोशी कुडाळ : कुडाळ तालुका जावली येथील  भिसे कॉलनी येथून रस्त्यावर खेळत असलेल्या तीन मुलींना (वय वर्ष ५, १०, व १२)चार चोरट्यांनी तोंड दाबून पिकअप गाडीत टाकून त्यांचे अपहरण केले. नशिब बलवत्तर म्हणून त्या मुलीनी अक्कल हुशारीने स्वतःची सुटका करून घेतली.
           याबाबत सुरेश भिसे यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान या मुली रस्त्यावर खेळत होत्या. त्यावेळी कुडाळ कडून आलेल्या पिकअप व्हॅन मधून तोंडावर मास्क बांधून आलेल्या चौघांनी या मुलींचे तोंड दाबून त्यांना गाडीत टाकले व ते पुणे बेंगलोर महामार्गावरून आणेवाडीच्या दिशेने निघाले. उडतारे ते आनेवाडीच्या दरम्यान असणाऱ्या एका टपरी जवळ ही पिकअप थांबली त्यावेळी या मुलीनी गाडीतून उड्या मारल्या व लपून बसल्या.

मुली हातातून निसटल्याचे लक्षात येतात पिकअप व्हॅन उलट दिशेने भुईंज कडे  निघून गेली. हे पाहून मुलींनी  आनेवाडी टोलनाक्याच्या दिशेने धाव घेतली. या तिघीतील एका मुलीला त्यांच्या आईचा मोबाईल नंबर पाठ असल्याने तिने  तेथील बालाजी हॉटेल मधून त़्यानी घरी संपर्क केला. त्यानंतर त्यांच्या घरचे व आजूबाजूचे लोक बालाजी हॉटेल कडे गेले व तेथून  भुईंज पोलीस स्टेशनला गेले. परंतु घडलेली घटना मेढा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने तेथून ते मेढा पोलीस स्टेशनला गेले. परंतु त्या ठिकाणी सपोनि सुधीर पाटील उपस्थित नव्हते त्यामुळे ठाणे अंमलदारांनी तक्रार लिहून घेतली व त्यानंतर रात्री एक वाजता मुलींना घरी आणले.

या सर्वांना आज पुन्हा मेढा पोलीस स्टेशनला बोलावण्यात आले आहे दरम्यान या घटनेबाबतची विस्तृत माहिती पोलीस चौकशीत समोर येईलच.तेव्हा सर्व पालकांनी सतर्क रहावे, मुलांवर काळजीपुर्वक लक्ष ठेवावे, विशेषकरुन जे रस्त्याच्या कडेला रहातात. मुलींनी नंतर सांगितले ती माणसे आपसात हिंदीत बोलत होती. त्यामुळे कामे होतात म्हणून परप्रांतीयांचा विश्वास करु नका, लाढ करु नका नाहीतर कधीतरी भोगावेच लागेल. असा इशारा सुरेश भिसे यांनी दिला आहे.
  
          

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page