
कुडाळ – प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे दिवंगत चेअरमन राजेंद्र लालसिंगराव शिंदे तथा भैय्यासाहेब यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक 10 रोजी निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराजा शिवाजी हायस्कूल कुडाळ व जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कुडाळ येथील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
या स्पर्धा पहिली ते दुसरी तिसरी ते चौथी पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा विविध गटात घेण्यात येणार आहेत प्रत्येक गटातून तीन क्रमांक काढण्यात येणार आहेत यशस्वी विद्यार्थ्यांना सायकल स्पोर्ट शूज स्टडी टेबल रिस्ट वॉच स्कूल बॅग असे विविध प्रकारचे आकर्षक बक्षिसांचे वितरण 15 ऑगस्ट रोजी कुडाळ ग्रामपंचायत समोर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन या स्पर्धेचे आयोजक सौरभ बाबा राजेंद्र शिंदे मित्र समूहाच्या वतीने करण्यात आले आहे